सभासदांनी संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे: चेअरमन भारती चोपडे
कुंभोज येथे कर्मवीर पतसंस्थेच्या आधुनिक कार्यालयाचे उदघाटन
कुंभोज : खरा पंचनामा
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली च्या कुंभोज (ता. हातकणंगले) येथील शाखेचा प्रशस्त आणि आधुनिक कार्यालयात स्थलांतर सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. या नूतन कार्यालयाचे उद्घाटन संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांच्या अमृतहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
कार्यक्रम प्रसंगी कर्मवीरअण्णा व पतसंस्थेचे संस्थापक स्व. डॉ. आप्पासाहेब चोपडे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भारती चोपडे म्हणाल्या, कर्मवीर पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून, ती सामाजिक व सहकार चळवळीच्या तत्त्वाने अविरतपणे कार्य करत आहे. एखादी संस्था जेव्हा १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी गोळा करू शकते, तेव्हा तो सभासदांचा संस्थेप्रती असलेला प्रचंड विश्वास आणि पारदर्शकता अधोरेखित करतो. आपल्या ग्रामीण भागातील ही संस्था आज थेट राज्यपातळीपर्यंत आपल्या उत्कृष्ट कार्याने नावारूपाला येत आहे, ही आम्हा सर्वांसाठी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.
गेल्या ३९ वर्षांपासून संस्था नियमितपणे अनेक चांगले व आदर्श उपक्रम राबवत आहे. याचे संपूर्ण श्रेय संचालक मंडळाचे चोख नियोजन आणि त्याला सभासद व सेवकांनी दिलेली खंबीर साथ यांना जाते.
संस्था आज आर्थिकदृष्ट्या भक्कम पायावर उभी असल्याचे सांगून त्यांनी भविष्यातही सभासदांनी असाच भक्कम आधार द्यावा, जेणेकरून संस्थेचा नावलौकिक अधिक वाढवता येईल, असे आवाहन केले.
या सोहळ्यात संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. एस. पी. मगदूम यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा व प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या सोहळ्या दरम्यान विविध क्षेत्रांतील भगिनी संस्था व मान्यवरांच्या वतीने कर्मवीर पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाला शुभेच्छा देण्यात आल्या तसेच चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सतीश पाटील, सुभाष पाटील, संजय पाटील, धनपाल कळंत्रे, अशोक पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट सेवेबद्दल अभिनंदन उपाध्ये आणि अभिजीत खोत यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, शरद साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, कर्मवीर ग्रामीण पतसंस्थेचे संचालक किरण माळी, अभिनंदन पतसंस्थेचे संचालक बाबासाहेब पाटील, प्रकाश पाटील, बलोपंत कुलकर्णी, प्रकाश पाटील-रखरखे, शितल कळंत्रे, भरतेश्वर भोकरे, कार्तिक चौगुले आणि धुधेश्वर इंगळजे, व्हाईस चेअरमन ॲड. एस. पी. मगदूम यांच्यासह संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू, बजरंग भाऊसो माळी, तज्ज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे, वसंतराव धुळाप्पा नवले, डॉ. एस. बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील आणि अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते.
स्वागत आणि प्रास्ताविक चेअरमन श्रीमती भारती चोपडे यांनी केले. आभार मुख्य अनिल श्रीपाल मगदूम यांनी मानले. या सोहळ्यासाठी कुंभोज परिसरातील ग्रामस्थ, नागरिक आणि पतसंस्थेचे सेवक उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.