Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मान्सूनने व्यापला संपूर्ण महाराष्ट्र, IMD कडून मुसळधार पावसाचा अलर्ट

मान्सूनने व्यापला संपूर्ण महाराष्ट्र, IMD कडून मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई : खरा पंचनामा 

मागील काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात सोलापुरात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला. आणि आता मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

24 जून रोजी मान्सून सुरत, इंदूर, मंडला, डाल्टनगंज, मोतिहारी मधून जात आहे. आज, 24 जून रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी ईशान्य अरबी समुद्राचा काही भाग, गुजरात व मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उर्वरित भाग आणि छत्तीसगड व झारखंडच्या आणखी काही भागांमध्ये अधिक प्रगती केली आहे.

पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती असून, या वाऱ्यांची प्रगती उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड व बिहारच्या उर्वरित भागांमध्ये आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये होईल; त्यानंतरच्या 2-3 दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये ही प्रगती होईल.

मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दादर, परळ, मलबार हिल, अंधेरी, कुर्ला, सायन आणि माटुंगा परिसरात मुसळधार पाऊल झाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.