Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आधी घरावर गोळ्या झाडल्या, आता २० कोटींसाठी पुन्हा रोहित शेट्टींना धमकीबिश्नोई टोळीतील 'त्या' व्यक्तीचं नाव समोर

आधी घरावर गोळ्या झाडल्या, आता २० कोटींसाठी पुन्हा रोहित शेट्टींना धमकी
बिश्नोई टोळीतील 'त्या' व्यक्तीचं नाव समोर

मुंबई : खरा पंचनामा 

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना पुन्हा धमकीचा फोन आला असून, २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणात नवीन खुलासा झाला. धमकी देणारा आवाज हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दिवंगत नेते, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील फरार आरोपी शुभम लोणकर याचा असल्याचं पोलीस तपासात समोर येत आहे.

शुभम लोणकर याचा आवाज आणि फोन कॉलमधील आवाज एकमेकांशी मेळ खात आहे. फॉरेन्सिककडून याचा तपास सुरू आहे.

शनिवारी सकाळी रोहित शेट्टींच्या स्टाफला एक फोन आला होता. त्यातून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावानं २० कोटींची खंडणी मागण्यात आली होती. जुहू येथील शेट्टींच्या घरावर गोळीबार हा फक्त ट्रेलर होता. यावेळी पैसे दिले नाहीतर थेट गोळ्या रोहित शेट्टींना लक्ष्य करतील, अशी धमकी देण्यात आली होती. याच प्रकरणात शुभम लोणकर याचे नाव पुन्हा समोर आले आहे.

शुभम लोणकर हा बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात फरार आहे. १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर पाच राउंड फायर करण्यात आले होते. त्यातही शुभम लोणकर याचाच हात असल्याचे समोर आले होते.

या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलीस गुन्हे शाखेनं एप्रिल महिन्यात १ हजार ६२४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यात १५ आरोपींची नावे आहेत. यातील शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोई यांना फरार घोषित करण्यात आलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.