Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पन्नास हजाराची लाच घेताना जत पालिकेचा करनिर्धारण अधिकारी जाळ्यात सांगली एसीबीची कारवाई

पन्नास हजाराची लाच घेताना जत पालिकेचा करनिर्धारण अधिकारी जाळ्यात 
सांगली एसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

फोटो आणि व्हिडिओ शूटिंगचे बिल मंजूर करण्यासाठी ५० हजार रुपयाची लाच घेताना जत नगरपरिषदेचे  करनिर्धारण प्रशासकीय अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती सांगली एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.

प्रवीण रंगराव बाबर (वय ३१, सध्या रा. जत, मूळ रा. कामेरी, ता. वाळवा) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय असुन २०२५ मधील जत नगरपरीषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी फोटो आणि व्हिडीओ शुटींगचे कामाचे टेंडर त्यांना मिळालेले होते. सदर कामाचे बिल जत नगर परिषदेचे कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी  प्रविण बाबर याने मंजुर करुन घेवुन पुढे लेखा शाखेकडे पाठविलेले होते. तेथुन तक्रारदार यांना ३ लाख ४१ हजार ९२२ रुपयांचा चेक अदा करण्यात  आला होता. सदर अदा करुन दिलेल्या बिलाचा मोबदला मिळण्याकरीता संशयित प्रविण  बाबरने तक्रारदाराकडे ७५ हजार  रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि. १० जून रोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला होता. 

तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार  पडताळणी  केली असता प्रविण  बाबर याने तक्रारदाराकडे  ७५ हजाराची मागणी करुन तडजोडीअंती ५० हजार लाच  लागलीच  स्विकारण्याची संमती दर्शविली. त्यानंतर त्वरित सापळा कारवाई करून प्रविण बाबर याला जत नगरपरीषदेखालील असलेल्या यशोदा फोटो स्टुडीओमध्ये तक्रारदाराकडून ५० हजार रूपये लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध जत पोलीसात येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण, प्रितम चौगुले, सागर नायकुडे, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, ऋषिकेश बडणीकर, मनोज निळकंठ, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश जाधव, राजेश मुदगल, महेश शेंडगे, विना जाधव, चालक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.