Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

टीएमसीच्या त्या १९ बंडखोर खासदारांची नावे आली समोर क्रिकेटपटू युसूफ पठाण, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्री सायोनी घोष यांचा समावेश

टीएमसीच्या त्या १९ बंडखोर खासदारांची नावे आली समोर 
क्रिकेटपटू युसूफ पठाण, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्री सायोनी घोष यांचा समावेश 

कोलकाता : खरा पंचनामा 

तृणमूल काँग्रेसमधील खासदारांच्या फुटीची बातमी समोर आल्यानंतर बंडखोरांच्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेमधील एकूण २९ खासदार आहेत.

बशीरहाटचे खासदार हाजी नुरुल इस्लाम यांचे निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त आहे. वेगळा गट स्थापन करायचा झाल्यास, सध्याच्या २८ पैकी बंडखोर गटाला २० खासदारांचा पाठिंबा लागेल. मात्र सध्या बंडखोर गटाकडे १९ खासदारांची स्वाक्षरी केलेली यादी आहे, असे सांगितले जाते. ही यादी लोकसभा अध्यक्षांना देण्यात आली असून काकोली घोष यांनी या गटाचा एनडीएला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

तृणमूल काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षाला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. पश्चिम बंगालमधील अनेक दशकांची डाव्या पक्षांची सत्ता तृणमूल काँग्रेसने उखडून फेकली. त्यानंतर तब्बल तीन टर्म ममता बॅनर्जी मुख्यमंत्री राहिल्या. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीत पराभव होताच, पक्षात बंड उफाळून आले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या सहकारी आणि ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी बंडखोर खासदारांच्या गटाचे नेतृत्व केले आहे. काकोली घोष यांच्याबरोबर कोण कोण खासदार आहेत? याची चर्चा होत होती. आता या खासदारांची नावे समोर आली आहेत.

यादी खालीलप्रमाणे (कंसात मतदारसंघाचे नाव) :
काकोली घोष (बारासात), शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल), जगदीशचंद्र बसुनिया (कूचबिहार), युसूफ पठाण (बहरामपूर), खलीलुर रहमान (जंगीपूर), अबू ताहिर खान (मुर्शिदाबाद), पार्थ भौमिक (बैरकपूर), बापी हलदर (मथुरापूर), सायोनी घोष (जादवपूर), माला रॉय (कोलकाता दक्षिण), मिताली बाग (आरामबाग), दीपक अधिकारी (घाटल), कालीपद सोरेन (झाडग्राम), जून मालिया (मेदिनीपूर), अरूप चक्रवर्ती (बांकुरा), शर्मिला सरकार (वर्धमान पूर्व), असित कुमार माल (बोलपूर), शताब्दी रॉय (बीरभूम), रचना बॅनर्जी (हुगळी)

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.