Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेती पंपाच्या केबल चोरीचा गुन्हा ८ तासांत उघडरहिमतपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, १००% मुद्देमाल हस्तगत!

शेती पंपाच्या केबल चोरीचा गुन्हा ८ तासांत उघड
रहिमतपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, १००% मुद्देमाल हस्तगत!

पूजा फडके 
सातारा / रहिमतपूर : खरा पंचनामा 

मौजे साप गावच्या खडकी शिवारातून ८ शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या तांब्याच्या केबल वायर चोरीला गेल्याचा गंभीर गुन्हा रहिमतपूर पोलिसांनी अवघ्या ८ तासांत उघडकीस आणला आहे. पोलिसांनी कारवाई करत चोरीला गेलेला ५५,३०० रुपये किमतीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला असून, या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दिनांक २१ ते २२ जून २०२६ दरम्यान साप गावातील खडकी शिवारातून विहिरीवरील व कॅनॉलवरील शेतीपंपांच्या केबल वायर्स चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०१/२०२६, बी.एन.एस. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढत्या उष्णतेच्या काळात पिकांना पाणी देण्याची अत्यंत गरज असतानाच ही चोरी झाल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. कोणताही ठोस पुरावा नसताना अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी तातडीने तपास पथक तयार केले.

तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने व गोपनीय माहितीच्या आधारे धागेदोरे मिळवत अवघ्या ८ तासांत या चोरीचा छडा लावला. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या चोरीला गेलेल्या सर्व तांब्याच्या केबल वायर्स (एकूण किंमत रु. ५५,३००/-) जप्त केल्या. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार निकम करत आहेत.

सदरची धडाकेबाज कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार निकम, प्रवीण बर्गे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे, राहुल मदने आणि रमेश बर्गे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे साप परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून रहिमतपूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.