महाराष्ट्र पोलीस दलाला राज्य सुरक्षा महामंडळाचा 'आधार'

मुंबई : खरा पंचनामा 

राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांची मदत घेण्यात येणार आहे. अनेक पदे रिक्त असल्याने या पदांची नियमित भरती होईपर्यंत सुरक्षा मंडळाचे सुमारे तीन हजार जवान पोलीस दलाला मदत करणार आहेत.

पोलीस अंमलदारांची एकूण मंजूर संख्या ४१ हजार ९६६ असून, त्यापैकी ३८ हजार ८० पोलीस प्रत्यक्षात प्रत्यक्ष कार्यरत आहेत. उर्वरित सुमारे ३८८६ पोलीस अंमलदाराची पदे रिक्त आहेत. आगामी भरतीत या रिक्त पदांपैकी तीन हजार ५२१ पदे भरण्यात येणार आहेत. तर उर्वरित पदे त्यानंतरच्या भरतीत भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदामुळे तसेच पोलीस भरतीची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असल्याने तीन हजार ८८६ पदांची पुढील एक वर्षभर कमतरता भासणार आहे.

मुंबईत चार नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली असल्याने या पोलीस ठाण्यास एकूण एक हजार ३२८ अंमलदाराची पद निर्मिती केली आहे. ही पदे आगामी भरतीत भरण्यात येणार असली तरी प्रत्यक्षात वर्षभर त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. या नवीन पोलीस ठाण्यास इतर पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने मुंबई पोलीस दलावर अतिरिक्त ताण पडणार आहे.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, आसनगाव, अंबरनाथ व भाईंदर या चार लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या निर्मितीस व त्यासाठी एकूण २७९ पदांची निर्मिती करण्यास व शासनाने मान्यता दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.