Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रालयातील वाढत्या गर्दीवर कायमस्वरुपी तोडगा, मंत्रालयाची जागा बदलणार?

मंत्रालयातील वाढत्या गर्दीवर कायमस्वरुपी तोडगा, मंत्रालयाची जागा बदलणार?

मुंबई : खरा पंचनामा 

मंत्रालयातील वाढती गर्दी आणि जागेची प्रचंड कमतरता यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अखेर नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक २२ मजली 'एअर इंडिया' इमारत खरेदी पूर्ण केली आहे.

तब्बल १ हजार ६०१ कोटी रुपयांच्या या खरेदी व्यवहाराचा धनादेश मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'एआयएएचएल' कंपनीला सुपूर्द केला जाईल. या हस्तांतरानंतर ही ऐतिहासिक इमारत अधिकृतपणे राज्य सरकारच्या मालकीची होणार असून, २०२४ पासून तांत्रिक अडचणींमुळे रेंगाळलेला हा व्यवहार अखेर पूर्णत्वास जात आहे. जून २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर शासकीय कार्यालयांसाठी जागेचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी, अनेक महत्त्वाची खाती फोर्ट आणि परिसरातील खासगी इमारतींमध्ये भाड्याने हलवावी लागली होती.

या विखुरलेल्या कार्यालयांच्या भाड्यापोटी राज्य सरकारला दरवर्षी २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे. एअर इंडियाची इमारत ताब्यात आल्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आणली जातील. यामुळे कोट्यवधींची बचत होईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.