उद्धव ठाकरेंना मोठा दणका!
नेत्याने एबी फॉर्म घेऊन भरलाच नाही, मोठी खळबळ
नाशिक : खरा पंचनामा
राज्यात सध्या आगामी विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. या प्रक्रियेत एकूण सतरा जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आजपासून या सर्व अर्जाची अधिकृत छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेत हंगामा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरे सेनेत खळबळ माजली असल्याचे कळत आहे. नाशिकचे नेते अनिल कदम यांनी मातोश्रीशी चर्चा करुनही फॉर्म भरला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर वसंत गीते यांनी फॉर्म घेऊनही भरला नाही असे सूत्रांमार्फत कळतंय. वसंत गीते यांनी फॉर्म घेतला होता मात्र, तो फॉर्म भरला नाही अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेने मोठी खळबळ माजली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.