Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नीट पेपर फुटी प्रकरण : मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे आणि शुभम खैरनार यांची तुरुंगातच सीबीआय चौकशी

नीट पेपर फुटी प्रकरण : मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे आणि शुभम खैरनार यांची तुरुंगातच सीबीआय चौकशी

मुंबई : खरा पंचनामा 

'नीट' (NEET) पेपर लीक प्रकरणातील तीन आरोपींची तुरुंगातच चौकशी करण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची याचिका न्यायालयाने सोमवारी मंजूर केली आहे. न्यायाधीश सुरेंद्र मोहित सिंग यांच्यासमोर सीबीआयच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती.

या याचिकेत मनीषा संजय वाघमारे, धनंजय निवृत्ती लोखंडे आणि शुभम मधुकर खैरनार या न्यायलयीन कोठडीत असलेल्या तीन आरोपींची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती.

सीबीआयने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, "तपासात असे समोर आले आहे की हे तिन्ही आरोपी मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी 3 मे रोजी झालेल्या 'नीट यूजी २०२६' (NEET UG 2026) च्या परीक्षेपूर्वी पैशांच्या बदल्यात प्रश्नपत्रिका लीक करणे आणि त्या इतरत्र पोहोचवण्याचे काम केले होते."

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.