Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"इथे वाघाचं जीवन जगत होते. तिकडे गाढवाचं जीवन जगा"

"इथे वाघाचं जीवन जगत होते. तिकडे गाढवाचं जीवन जगा"

यवतमाळ : खरा पंचनामा 

माजी मुख्यमंत्री आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत. आजपासून पुढील दोन दिवस त्यांच्या सभा पार पडणार आहेत. आज २७ जून रोजी त्यांनी यवतमाळ येथे जात पहिली सभा घेतली. या सभेतून त्यांनी उबाठाचे फुटीर खासदार संजय देशमुख यांच्यावर सडकून टीका केली.

'दोन आठवड्यांपूर्वी खासदारांची बैठक घेतली. ते म्हणाले मला मुलीची सोयरीक जुळवायची आहे. व्हिडिओ कॉलवरून हजर राहतो. मला काय माहीत मुलीची सोयरिक जुळवत होते की स्वताची सोयरीक जुळवत होते. मी रात्री फोन केला. जुळलं का. हो म्हणाले. जुळलं दोन दिवसाने कळलं. गेले सासरी, आता नांदा तिकडे, गद्दाराच्या कळपात नांदा. इथे वाघाचं जीवन जगत होते. तिकडे गाढवाचं जीवन जगा.' असा घणाघाती वार उद्धव ठाकरेंनी खासदार संजय देशमुख यांच्यावर केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी, 'आता हा गद्दार जिथे सापडेल तिथे जाब विचारा. मी निवडून आणलं, का गद्दारी केली. मला पैसे मिळाले असते तर मीही तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याला जागलो. निष्ठेला जागलो. तू बोल का गद्दारी केली. असं विचारा. पुढचे तीन वर्ष हा कार्यक्रम करावा लागेल असं आवाहन शिवसैनिकांना त्यांनी केले आहे.

सध्या देशभरात अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिरातील दानचोरीचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणावर थेटपणे न बोलता उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं. "आपलं हिंदूत्व माणुसकी लुटणारं आहे. मंदीर लुटणारं नाही." त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कोणाकडे होता याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

"हिंदुंना जागृती आली पाहिजे. आजचा सामनातील अग्रलेख वाचा. मध्ये मध्ये मोर्चा काढणारे झोपले आहेत का? सकल हिंदू समाज वाले कुठे आहेत? भाजपमुक्त राम पाहिजे. आम्ही त्यासाठी आंदोलन करणार आहोत." अशी मोठी घोषणा यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.