Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हातावर पोट असलेल्या गरीब बापाची पोरगी बनली कोट्यधीश, आयकर विभागाकडून 20 कोटींची नोटीस!

हातावर पोट असलेल्या गरीब बापाची पोरगी बनली कोट्यधीश, आयकर विभागाकडून 20 कोटींची नोटीस!

लखनऊ : खरा पंचनामा 

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका सामान्य कुटुंबातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला आयकर विभागाने तब्बल २०.९८ कोटी रुपयांच्या व्यावसायिक व्यवहारा प्रकरणी नोटीस बजावली आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या बँक खात्यातून हे व्यवहार झाले होते. ज्यावेळी एवढ्या मोठ्या रकमेची नोटीस आली, तेव्हा विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन हादरली.

उन्नावमधील गिरिजाबाग परिसरात राहणारी रश्मि सविता ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून ती पदवीचं शिक्षण घेत आहे. रश्मिचे वडील अजय शंकर हे रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबाला जेव्हा आयकर विभागाची नोटीस मिळाली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. आयकर विभागाच्या चंदीगड कार्यालयाने रश्मिच्या विरोधात आयकर कायद्याच्या कलम १३१ (१ए) अंतर्गत ही नोटीस जारी केली होती.

या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता, रश्मिच्या नावावर दिल्लीतील बुराडी परिसरात 'आरएस एंटरप्राइजेज' (RS Enterprises) नावाची एक कंपनी सुरू असल्याचे समोर आलं. रश्मिच्या दाव्यानुसार, कोणत्या तरी अज्ञात फसवणूक करणाऱ्या टोळीने तिच्या नकळत तिचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून बनावट कंपनी स्थापन केली. याच कंपनीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यात आले.

२०२५ रोजी आपले काम सुरू केले होते आणि अवघ्या काही महिन्यांतच म्हणजे ९ मे २०२५ रोजी ती बंदही करण्यात आली. या काही महिन्यांच्या कालावधीत कंपनीच्या माध्यमातून तब्बल २०.९८ कोटी रुपयांची उलाढाल आणि व्यावसायिक व्यवहार करण्यात आले. त्यामुळे आयकर विभागाने रश्मिला नोटीस पाठवून जाब विचारला.

रश्मिने स्पष्ट केलं की, तिचा या कंपनीशी किंवा कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही. तिने या नोटिसीला कायदेशीर उत्तर आयकर विभागाकडे सादर केलं आहे. याशिवाय, आपल्या शासकीय कागदपत्रांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्यामुळे तिने सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टलवर आपली तक्रार नोंदवली आहे. तसेच, या संपूर्ण फसवणुकीची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, यासाठी तिने स्थानिक पोलिसांकडेही लेखी अर्ज दिला आहे. आता हे ट्रान्झेक्शन्स कुणी केले? याचा तपास आयकर विभागाकडून केला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.