Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अखेर अण्णामलाईंचा भाजपला रामरामकाही मिनिटांतच नव्या पक्षाची घोषणा, भाजप राजकीय शत्रू...

अखेर अण्णामलाईंचा भाजपला रामराम
काही मिनिटांतच नव्या पक्षाची घोषणा, भाजप राजकीय शत्रू...

 चेन्नई : खरा पंचनामा 

भाजप तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांचा राजीनामा पक्षाध्यक्ष नितीन निबीन यांनी स्वीकारला आहे. पक्षानेच याबाबतची घोषणा केली. त्यानंतर काही मिनिटांतच अण्णामलाई यांनी समर्थकांशी संवाद साधताना नव्या पक्षाचीही घोषणा केली.

अण्णामलाई यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थकांशी संवाद अनेक बाबींचा खुलासा केला. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत नितीन नबीन तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्याचवेळी त्यांनी नबीन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र, त्यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी पक्षाने तीन दिवस घेतले. मी ४ डिसेंबरलाच राजीनामा दिला होता. पण पक्षानेच निवडणूक होईपर्यंत सांगितल्याचा गौप्यस्फोट अण्णामलाई यांनी केला.

राजीनामा मंजूर झाल्यानंतर अण्णामलाई यांनी समर्थकांशी संवाद साधताना नव्या पक्षाच्या माध्यमातून आगामी निवडणुका लढण्याचीही घोषणा केली. भाजपमध्ये घालविलेली सहा वर्षे ही ही खूप मोठी संधी होती. राजकारणाचा खूप अनुभव मिळाला. माझे ध्येय आता मोठे आहे. राजकारणात बदल होण्याची आता गरज आहे, असे त्यांनी सांगितले. 'We the Leaders' या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी नव्या वाटचालीला सुरूवात करण्याची घोषणा केली.

पुढील राजकीय वाटचालीबाबत माहिती देताना अण्णामलाई म्हणाले, राजकारणात आता एक नवी चळवळ सुरू होणार आहे. आमचा पक्ष पुढील निवडणुका स्वतंत्रपणे लढेल. डीएमके, एआयएडीएमके, टीटीव्ही, वायको यांच्याप्रमाणेच आम्ही भाजपकडेही त्याच दृष्टीने पाहू, असे सांगत अण्णामलाई यांनी भाजपला राजकीय शत्रू म्हणून जाहीर केले.

आपल्या राजकीय पक्षामध्ये घराणेशाही असणार नाही, त्यासाठी टर्मची मर्यादा लागू केली जाईल, असेही अण्णामलाई यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आपल्या मनात नेहमीच आदर असेल. पण कोणत्याही मुद्द्यावर भाजप किंवा त्यांच्या विचारांशी मतभेद असतील तर ते आपण प्रकर्षाने मांडू, असेही त्यांनी सांगितले. आपण भाजपमध्ये राहूनही त्रिभाषा धोरणाला विरोध केल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.