कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांना मारहाण, गर्दीत घुसून उचलला हात
मुंबई : खरा पंचनामा
नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन छेडून संपूर्ण देशभरातील युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जयपूर येथे आंदोलन सुरू असताना काही युवकांनी अभिजीत दिपके यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कानशिलात लगावली. ही घटना घडल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. दिपके यांना मारहाण करणाऱ्या अज्ञातांविरोधात आंदोलनस्थळी मोठा रोष पाहायला मिळाला.
अभिजीत दिपके यांनी नवी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन केल्यानंतर पुण्यात विद्यापीठात मोठे आंदोलन केले. त्यानंतर देशभरातील अनेक ठिकाणी आंदोलन करणार असल्याची घोषणा दिपके यांनी केली. त्यानुसार आज जयपूर येथे आंदोलन सुरू होते.
जयपूरमध्ये आंदोलन सुरू असताना एका अज्ञाताने दिपके यांच्या दिशेने जाऊन, गर्दीत घुसून त्यांच्यावर हात उचलला अन् गर्दीचा फायदा घेऊन तिथून निसटला. दीपके यांना मारल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र त्यांना मारू नका, सोडून द्या, असा इशारा दीपके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केला.
आंदोस्थळी असलेल्या पोलिसांकडून मारहाण करणाऱ्याचा शोध सुरू आहे. दुसरीकडे अभिजीत दिपके यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला तरुणाईकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ठिकठिकाणी दिपके यांच्या स्वागतासाठी गर्दी होत आहे. नियोजित आंदोलनाला देखील तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणीदरम्यान तरुणांना झुरळाची उपमा दिल्याने अभिजीत दिपके यांनी संतप्त होऊन 'कॉक्रोच जनता पार्टी' ही व्यंगात्मक राजकीय चळवळ सुरू केली. सरकारविरोधात रोष व्यक्त करीत अमेरिकेतून दिपके यांनी चळवळ सुरू केली. कॉक्रोच जनता पक्षाने समाजमाध्यमांवर अवघ्या काही दिवसांत कोट्यवधी फॉलोअर्स मिळवले. सुरुवातीच्या पाच दिवसांत कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर १०० लाख फॉलोअर्सचा आकडा पार केला होता. कॉक्रोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही मागे टाकले. परंतु नंतर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे अकाऊंट बॅन केले गेले.
भारतीय जनता पक्षाच्या नावाशी साधर्म्य साधत 'झुरळांना घाबरू नका, त्यांना लढा द्यायचा आहे, अशी भूमिका घेत तरुण पिढीने अर्थात 'झेन झी'ने या चळवळीला आपला पाठिंबा दर्शवला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.