सांगली जिल्ह्यात आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
तोरडमल कडेगावचे, दीडवाघ भिलवडीचे प्रभारी तर निशानदार यांची एलसीबीकडे नियुक्ती
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सहीने आज एक अधिकृत पत्रक काढून जिल्ह्यातील ८ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत प्रशासकीय बदल्यांचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ जे आणि २२ न मधील तरतुदींनुसार जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार दुय्यम अधिकाऱ्यांकडे सोपवून, नवीन नियुक्तीच्या ठिकाणी त्वरित हजर व्हावे आणि तसा पूर्तता अहवाल सादर करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणाची कुठे झाली बदली
सपोनि/अमोल बाळू माळी : नियंत्रण कक्ष, सांगली ते प्रभारी अधिकारी, कासेगाव पो. ठाणे
सपोनि/भरत तुकाराम पाटील : नियंत्रण कक्ष, सांगली ते प्रभारी अधिकारी, कुरळप पो. ठाणे
सपोनि/हरिश्चंद्र हणमंत गावडे : कासेगाव पो. ठाणे ते नियंत्रण कक्ष, सांगली
सपोनि/विक्रम आनंदराव पाटील : कुरळप पो. ठाणे ते नियंत्रण कक्ष
पोनि/सुधीर आनंदराव तोरडमल : नियंत्रण कक्ष, सांगली ते प्रभारी अधिकारी, कडेगाव पो. ठाणे
सपोनि/प्रशांत भिमराव निशाणदार : नियंत्रण कक्ष, सांगली ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली
सपोनि/किरण ब्रम्हदेव दिडवाघ : ईश्वरपूर पो. ठाणे ते प्रभारी अधिकारी, भिलवडी पो. ठाणे
सपोनि/लहू गौतम थाटे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली, ते प्रभारी अधिकारी, दहशतवादी विरोधी शाखा
या बदल्यांमुळे सांगली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला नवीन गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.