Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब, पुतण्याला मंत्रिपदाची चर्चा

राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब, पुतण्याला मंत्रिपदाची चर्चा

नाशिक : खरा पंचनामा 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र भुजबळ यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा जागेवर आणि मंत्रिपदावर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची वर्णी लागावी यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या होकाराची वाट पाहावी लागणार आहे.

राज्यसभेच्या जागेवर अनेक नावे चर्चेत असताना भुजबळ यांच्या नावावर पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. पक्षाचे युवा नेते खासदार पार्थ पवार यांनी भुजबळ यांचे नाव राज्यसभेच्या जागेसाठी सुचविले. त्याला सर्व नेत्यांनी सहमती दर्शविल्यानंतरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. उद्या सकाळपर्यंत नाव समजेल, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीसांसोबत चर्चा केली. या जागेसाठी भुजबळ इच्छुक असून पक्षाची त्याला संमती असल्याचे या नेत्यांनी फडणवीस यांना सांगितल्याचे समजते. मात्र समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावे लागेल. त्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असे फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते.

अजित पवार, सुनील तटकरे कुटुंबातील एक व्यक्ती केंद्रात आणि एक व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात आहे. त्यामुळे हाच न्याय भुजबळ यांनाही लावला जावा, अशी भुजबळ यांची इच्छा आहे. त्यासाठी समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.