Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं...

ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं...

मुंबई : खरा पंचनामा 

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादांना बारामती येथे विमान अपघातात काळाने हिरावले. त्यांचा विमान अपघात नसून तो घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

त्यांनी याप्रकरणी चार पत्रकार परिषद घेऊन विमान अपघातावर प्रेझेंटेशन दिले. त्यानंतर या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन केले. आता त्यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेचा संदर्भ देत काही जणांवर मोठा संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहेत. त्यात त्यांनी अहमदाबाद विमान अपघाताचा संदर्भ देत अजितदादांच्या विमान अपघाताविषयी मोठा सवाल उपस्थित केला आहे. 'अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होतंय. नियमानुसार एक वर्षाच्या आत AAIB चा अंतिम अहवाल येणं बंधनकारक असतं, परंतु अद्यापही अहवाल आलेला नाही! AAIB च्या तपासात क्रिमिनल अँगल नसतो, अहवाल वेळेवर येत नाही हे माहीत असूनही "अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट बघूया", असं जे म्हणतात ना ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं आहेत, असा संताप आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. मैत्री, नातीगोती केवळ भाषणामध्ये बोलायला आहे का, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही का? असा प्रश्न पडतो.' असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

रोहित पवार यांनी याप्रकरणात सीआयडी तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. ते दोनदा पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयातही गेले आहेत. व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक कॅप्टन व्ही. के. सिंग याला सीआयडीने व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप पवार यांनी केला होता. तर याप्रकरणात सीआयडीच्या संथ तपासावरही त्यांनी टीकास्त्र सोडले होते. याप्रकरणात रोहित पवार हे सातत्याने सवाल करत आहे. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेते याप्रकरणी सवाल विचारत नसल्यावरही त्यांनी तोंडसुख घेतले आहे. आता त्यांनी अहमदाबाद विमान अपघाताचा संदर्भदेत एएआयबीच्या भूलथापांना बळी न पडण्याचे संकेत दिले आहेत. तर अहवालाची वाट पाहणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.