प्रसिद्ध गायकाच्या जिमबाहेर गोळीबार, सलमानसोबत संबंधामुळे टार्गेट
बिश्नोई गँगने घेतली हल्ल्याची जबाबदारी
दिल्ली : खरा पंचनामा
पुण्यात जिम मालकावर गोळीबाराची घटना मध्य रात्री घडली. आता असाच प्रकार दिल्लीत घडला असून प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावाच्या मालकीच्या जीमबाहेर गोळीबार केलाय. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर जिम परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारलीय.
सोशल मीडियावर बिश्नोई गँगकडून एक ऑडिओ क्लिप शेअर करण्यात आलीय. सलमानसोबतच्या संबंधामुळे गुरु रंधावाला टार्गेट केलं आहे. हा फक्त ट्रेलर असल्याचंही त्यात म्हटलंय. गोळीबाराच्या घटनेनंतर दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिम बाहेरचं सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतलं असून अधिक तपास केला जात आहे. दहशत पसरवण्यासाठी बिश्नोईच्या नावाचा वापर केला जातोय का याचीही तपासणी पोलीस करत आहेत.
काळवीट शिकार प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून अभिनेता सलमान खानला टार्गेट करण्यात येत आहे. सलमान खानच्या घराबाहेरही गोळीबार केला गेला होता. तसंच सलमानशी जवळीक साधणाऱ्यांनाही टार्गेट केलं जाईल अशा धमक्या बिश्नोई गँगकडून दिल्या जातात. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील घराबाहेरही गोळीबार झाला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.