Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना कायमस्वरुपी नोकरीवनमंत्री गणेश नाईक यांची अधिवेशनात घोषणा

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना कायमस्वरुपी नोकरी
वनमंत्री गणेश नाईक यांची अधिवेशनात घोषणा

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना कायमस्वरुपी नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.

मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत केली. वाघ, बिबट्या सारख्या प्राण्यांना सहज खाद्य मिळण्यासाठी कुक्कुट पालनाच्या धर्तीवर ससे पालन, हरीण पालन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अतुल भातकळकर, सुधीर मुनगंटीवार अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेद्वारे वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा प्रश्न उपस्थितीत केला होता. जयंत पाटील, निलेश राणे, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, प्रविण दटके आदींनी चर्चेत सहभाग घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील चार महिला वाघाच्या हल्लात मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेकडे भातखळकर यांनी लक्ष वेधले.

वन्यजीव आणि मानव संघर्ष आता नवा राहिला नाही, या घटना राज्याच्या विविध भागात रोज घडत आहेत. विदर्भात वाघाचे तर पश्चिम महाराष्ट्रात बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. सरकार वाघाच्या हल्ल्यासाठी संवेदनशील असलेल्या दहा जिल्ह्यांत उपाययोजना केल्याचे सांगते आहे. मानव - वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी २६० कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरीही दिली आहे, यापैकी किती कोटी रुपयांचा निधी वन विभागाकडे वर्ग झाला आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला.

तेंदूपत्ता जमा करण्यासाठी गेलेल्या सात महिलांवर वाघाने हल्ला केला. त्यातील चार महिलांचा मृत्यू झाला, अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करत आहोत. अशा घटना घडू नये यासाठी नाशिक येथे साडेपाच हजार हेक्टर जागेवर ताडोबा सारखे अभयारण्य विकसीत करणार आहोत. वन्य प्राण्यांना अटकाव करण्यासाठी बाबूंची रोपे लावून बाबूंची भींत निर्माण केली जाईल. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील जिल्ह्यांत आम्ही अशी तयारी सुरू केली केली आहे, असेही नाईक म्हणाले.

काँग्रेसचे सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अतिरिक्त वाघांच्या संख्येचा मुद्दा उपस्थितीत केला. विदर्भात जंगलाच्या क्षमतेपेक्षा चार पट वाघांची संख्या झाली आहे. पुरेसे खाद्य मिळत नसल्यामुळे ते जंगलाबाहेर येऊन लोकांवर हल्ले करतात. अतिरिक्त वाघ दुसरीकडे हलवा. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील एकाला कायमस्वरुपी नोकरी द्या, अशी मागणी केली. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही अशीच मागणी केली. त्याला उत्तर देताना नाईक यांनी पुढील ४२ महिन्यांत ताडोबाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात अभयारण्य उभारली जातील. विदर्भातील ४५० पैकी अतिरिक्त वाघांचे स्थलांतर केले जाईल. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र, तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारी उभारली जाईल, अशी घोषणा केली.

सुधीर मुनगुंटीवार यांनी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना ३० दिवसांत भरपाई देणे बंधनकारक असतानाही सहा - सहा महिने मदत मिळत नाही. यापूर्वी मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना उणे प्राधिकाराचा अधिकार होता, तो पुन्हा देण्याची मागणी केली. नाईक यांनी उणे प्राधिकारातून मदतीचे अधिकार पुन्हा दिले जातील. आमदार निलेश राणे यांनी कोकणातील वन्य प्राण्यांच्या, माकडांचे हल्ल्याचा प्रश्न उपस्थितीत केला. वन विभागाकडे निधी नसताना मंत्री केवळ घोषणा करीत सुटले आहेत. विदर्भातील वाघ सह्याद्रीत आणून सोडताना काय नियोजन केले, असा सवाल केला. त्यावर कोकणातील सर्व आमदारांची बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही नाईक यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.