तामिळनाडुत भाजपला धक्का, थांबवण्याचा प्रयत्न करूनही अन्नमलाईंनी सोडला पक्ष
दिल्ली : खरा पंचनामा
तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष के अन्नामलाई यांनी मंगळवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे पाच पानी राजीनामा सोपवला. यानंतर अन्नामलाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि ते चेन्नईला रवाना झाले.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकीत अन्नामलाई यांनी सौहार्दपूर्ण वातावरणात पक्षातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
अन्नामलाई यांनी स्पष्ट केलं की, "माझा मार्ग मला स्वतःला ठरवायचा आहे." भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी अन्नामलाई यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका देण्याबाबतही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. तसंच पक्ष नेतृत्वाने लगेच दिल्ली सोडू नये असं सांगितलं होतं.
गेल्या काही महिन्यांपासून तामिळनाडुच्या राजकारणात अन्नामलाई भाजपमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा होत्या. २०२५ मध्ये त्यांच्या जागी नैनार नागेंद्रन यांना भाजपने प्रदेशाध्यक्ष बनवताच या चर्चांना उधाण आलं होतं. एमजीआर आणि जयललिता यांच्याबाबत केलेल्या आक्रम विधानांमुळे एआयडीएमकेसोबतच्या युतीत तणाव निर्माण झाला होता आणि त्याचा फटका पक्षाला बसला. मदुराईसह अनेक ठिकाणी समर्थकांनी पुढचा अवतार घेण्याचं आणि तामिळनाडुला वाचवण्याचं आवाहन करणारी पोस्टर लावली होती.
अन्नामलाई २०२० मध्ये राजकारणात आले होते आणि तामिळनाडू भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. आता भाजपमधून बाहेर पडल्यानंतर जनआंदोलन सुरु करण्याच्या विचारात असल्याचं सांगण्यात येतंय. भविष्यात ते दुसऱ्या राजकीय पक्षात जाणार की नवा पक्ष स्थापन करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. येत्या दोन दिवसात पुढील वाटचालीबाबत सांगणार असल्याचं अन्नामलाई यांनी म्हटलंय.
तामिळनाडुत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला आणि विजय मुख्यमंत्री बनले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर अन्नामलाई यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा हा तामिळनाडुच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जात आहे. विजयच्या राजकारणातील उदयामुळे तामिळनाडुद द्रविड युगाचा अंत झाल्याचं अन्नामलाई यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे. फक्त भाषिक मुद्द्यावर, अस्मितेवर आता राजकारण चालणार नाही असंही म्हटलं जातंय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.