Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ममता बॅनर्जीच्या हातून तृणमूल निसटला; अध्यक्षपदावरून हटवलंबंडखोर गटाचा सर्वात मोठा धक्का, नव्या अध्यक्षाची घोषणा

ममता बॅनर्जीच्या हातून तृणमूल निसटला; अध्यक्षपदावरून हटवलं
बंडखोर गटाचा सर्वात मोठा धक्का, नव्या अध्यक्षाची घोषणा

कोलकाता : खरा पंचनामा 

तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृखालील बंडखोर आमदाराच्या गटाने ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवलं आहे.

तर अभिषेक बॅनर्जी यांना थेट पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. बंडखोर आमदाराच्या गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आपणच खरी तृणमूल असल्याचा दावा या बंडखोर आमदारांच्या गटाकडून करण्यात आला आहे, त्यानंतर या बंडखोर गटाकडून संघटनात्मक समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे, संघटनात्मक समितीची स्थापना करताच बंडखोर आमदाराच्या गटाने मोठी घोषणा केली आहे, त्यांनी ममता बॅनर्जी यांना पार्टीच्या अध्यक्षपदावरून हटवलं असून, अभिषेक बॅनर्जी यांना तर थेट पक्षातून निलंबित करण्यात आल्याचा ठराव मंजूर केला आहे.

बंडखोर गटाचे ज्येष्ठ आमदार अरूप रॉय यांची नव्याने स्थापन झालेल्या संघटनात्मक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यू टाऊनमधील एका हॉटेलमध्ये या बंडखोर आमदारांची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये हे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला कोलकाता महापालिकेसह तीन जिल्ह्यांमधील 70 नगरसेवकांची देखील उपस्थित होती. या बैठकीमध्ये ममता बॅनर्जी यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं असून, त्यांच्या जागी आता अध्यक्ष म्हणून अरूप रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरूप रॉय हे हावडा सेंट्रल मतदारसंघाचे आमदार आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. आधी आमदार फुटले, त्यानंतर खासदार फुटले आता तर ममता बॅनर्जी यांना थेट अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे. तसेच अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे, त्यांच्याऐवजी अध्यक्ष म्हणून अरूप रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.