Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ना. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शासकीय रुग्णालयास औषधांची भेट

ना. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शासकीय रुग्णालयास औषधांची भेट

मिरज : खरा पंचनामा 

राज्याचे लोकप्रिय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वदेशी औषध उद्योग समूह, सांगली आणि भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास सुमारे ६८ हजार रुपये किमतीची औषधे प्रदान करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत रुग्णालयातील गरीब व गरजू रुग्णांना आवश्यक औषधांचा लाभ मिळणार असून, या औषधांमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळेल, असा विश्वास भाजपा जैन प्रकोष्ठाचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

औषधांचे वितरण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियांका राठी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय माने तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियांका राठी यांनी स्वदेशी औषध उद्योग समूह आणि भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ यांच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अनेक गरजू रुग्णांना या औषधांचा मोठा लाभ होणार असून, रुग्णसेवेसाठी अशा प्रकारचे सहकार्य अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सुमारे ६८ हजार रुपये किमतीची औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी स्वदेशी औषध उद्योग समूह, भाजपा जैन प्रकोष्ठ आणि या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी भाजपा जैन प्रकोष्ठाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख प्रशांत गोंडाजे , श्री. शीतलनाथ चौगुले, अश्विनी पाटील, विपुल पाटील तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.