सांगलीत भाजपा जैन प्रकोष्ठच्या सभासद नोंदणी अभियानाला वेग
सांगली : खरा पंचनामा
भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठाच्या माध्यमातून जैन समाजातील अधिकाधिक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जोडण्यासाठी सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भाजपा जैन प्रकोष्ठाचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वदेशी व्हिला येथे जैन प्रकोष्ठ शहर जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक व सभासद फॉर्म वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी जैन समाजातील कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर पक्षाशी जोडण्याचा संकल्प करण्यात आला. अभियानांतर्गत दहा हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्या अनुषंगाने सभासद फॉर्मचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष महावीर पाटील यांनी सेक्रेटरी पदी शितलनाथ चौगुले, सहसचिव पदी सचिन पाटील व संघटक पदी चंद्रकांत पाटील यांची निवड केली
कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र विभाग प्रमुख गोंडाजे यांनी प्रास्ताविक करत जैन प्रकोष्ठाच्या संघटनात्मक कार्याची माहिती दिली. त्यानंतर मार्गदर्शन करताना रावसाहेब पाटील यांनी जैन समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने सभासद नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, परस्पर सहकार्याने अधिकाधिक सभासद नोंदणी करून निश्चित केलेले उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास भाजपा जैन प्रकोष्ठाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी ,संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.