Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

IAS अन् IPS महिला अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं झापलं!

IAS अन् IPS महिला अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं झापलं!

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

सर्वोच्च न्यायालयानं माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांना आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमधील वाद सोडवण्याचा आग्रह केला आहे. आयएएस अधिकारी रोहिणी सिंदुरी आणि आयपीएस रुपा मुदगिल यांच्यात बऱ्याच काळापासून कायदेशीर वाद सुरू आहे. या वादातून तोडगा काढण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं माजी न्यायमूर्तीकडे सोपवली आहे. या दोन्ही महिला अधिकारी जुलैमध्ये जोसेफ यांच्या समोर हजर होतील.

आयएएस रोहिणी सिंदुरी आणि आयपीएस रुपा मुदगिल या दोघी कर्नाटक केडरच्या ऑल इंडिया सव्हिर्सेसच्या अधिकारी आहेत. त्या दोघी गेल्या ३ वर्षांपासून एकमेकांविरोधात मानहानीचा खटला लढत आहेत. २०२३ मध्ये एका जाहीर कार्यक्रमात त्यांच्यात वितुष्ट आलं. तेव्हापासून सुरू झालेला वाद आजतागायत कायम आहे.

सर्वोच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांमधील वादाची दखल घेतली आहे. न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि संजीव सचदेवा यांच्या खंडपीठानं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जोसेफ कुरियन यांना या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा आग्रह केला आहे. एकमेकांविरोधात कायदेशीर लढा देऊन दोन्ही अधिकारी त्यांचं करिअर उद्ध्वस्त करत असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं केली. या वादातून तोडगा काढण्यासाठी सगळ्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना न्यायालयानं दोन्ही अधिकाऱ्यांच्या वकिलांना दिल्या. दोघींच्या वकिलांनी न्यायालयाचा सल्ला मान्य केला.

सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही अधिकाऱ्यांना जुलैमध्ये न्यायमूर्ती (निवृत्त) जोसेफ यांच्या समोर हजर राहण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयानं सत्र न्यायालयात दोन्ही अधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यांवरील सुनावणी रोखली आहे.

२०२३ च्या फेब्रुवारीत आयपीएस रुपा मुदगिल यांनी सोशल मीडियावर आयएएस रोहिणी सिंदुरी यांच्या विरोधात अनेक पोस्ट केल्या. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोपही केला. यानंतर रोहिणी यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यात त्यांना यश आलं. न्यायालयानं रुपा यांना पोस्ट न करण्याच्या सूचना दिल्या.

आयपीएस रुपा यांनी या निकालाला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिलं. पण त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली. मग त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. आपापसातील मतभेद मिटवण्याच्या सूचना त्यांना न्यायालयाकडून देण्यात आल्या. या प्रकरणी न्यायालयानं शुक्रवारी माजी न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांची मध्यस्थ म्हणून नेमणूक केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.