देशात करोना रिटर्न्स?
46 वर्षीय व्यक्तीचा तडफडून शेवट; दोन्ही फुफ्फुसं पूर्णपणे निकामी
अमरावती : खरा पंचनामा
भारतात पुन्हा एकदा करोना संकट परतलं आहे. आंध्र प्रदेशच्या कडप्पामध्ये करोना विषाणूमुळे ४६ वर्षीय व्यक्तीचा जीव गेला आहे. जिल्हा वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी रवी बाबू यांनी याबद्दलची माहिती दिली.
वेळेवर औषधं देऊनही रुग्णाची प्रकृती सुधारली नाही. चार दिवस उपचार घेतल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचं रवी बाबू यांनी सांगितलं. दगावलेला व्यक्ती दारुच्या आहारी गेलेला होता. त्याला दीर्घ श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. सोबतच त्याचा खोकल्याचाही त्रास सुरू होता. याचमुळे तो रुग्णात दाखल झाला होता.
कडप्पातील मासापेटा परिसरात राहणारा व्यक्ती करोना संसर्गानं त्रस्त होता. त्याला मद्यपानाची सवय होती. तो व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याला श्वास घेताना बराच त्रास व्हायचा. त्याला खोकलादेखील झाला होता. रुग्णालयात त्याचा एक्स-रे काढण्यात आला. त्याची दोन्ही फुफ्फुसं पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचं त्यातून समोर आलं. यामुळे त्याला निमोनियादेखील झाला होता, अशी माहिती रवी बाबू यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.
डॉक्टरांनी सुरुवातीला रुग्णाला अँटिबायोटिक औषधं दिली. पण चार दिवस उपचार करुनही त्याची प्रकृती सुधारली नाही. त्याची तब्येत दिवसागणिक बिघडत गेली. त्यामुळे डॉक्टरांना करोना संसर्गाची शंका आली. यानंतर रुग्णाच्या छातीचं सिटी स्कॅन करण्यात आलं. त्यातून करोना संसर्ग झाल्याचं उघड झालं.
रुग्णाच्या मृत्यूनंतर परिसरात योग्य खबरदारी घेण्यात आल्याची माहिती रवी बाबू यांनी सांगितलं. रुग्णाचा मृत्यू झाला, तिथली स्वच्छता करण्यात आली. सॅनिटायझेशन पूर्ण करण्यात आलं. मृत पावलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवण्यात आली. त्याच्या दैनंदिन संपर्कात येणाऱ्या आणि अन्य व्यक्तींची ओळख पटवली गेली आहे. संसर्ग पसरु नये यासाठी काळजी घेतली जात असल्याची माहिती बाबू यांनी दिली.
कडप्पा आणि तिरुपती जिल्ह्यांमध्ये करोनाचे ५ रुग्ण सापडले आहेत. मेडिकल एज्युकेशन डायरेक्टरकडून सरकारी रुग्णालयांमध्ये आयसोलेशन बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधं, रॅपिड टेस्ट किट, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संपूर्ण तपशील मागण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.