सुट्टीच्या दिवशीही पोलिसी कर्तव्य!
कराड शहराच्या वाहतूक पोलीस हवालदार तृप्ती वीर यांनी 9 महिन्यांच्या बाळाचं अन् आईचं प्राण वाचवले!
सौ. अनुजा कारखेले-देवरे
कराड : खरा पंचनामा
पोलीस दल हे नेहमीच संकटाच्या वेळी धावून येणारे एक महत्त्वाचे संरक्षण कवच मानले जाते. कर्तव्यावर असताना किंवा नसताना करा पोलीस नेहमीच सतर्क असतो याचाच प्रत्यय नुकताच कराड शहरांतून समोर आला आहे. कायदा सुव्यवस्थाच नाही तर प्रसंगी माणुसकीचा धर्म पाळणाऱ्या या महिला पोलीस हवालदार तृप्ती वीर यांचे संपूर्ण कराड शहरांतून तोंडभरून कौतुक केले जात आहे.
रविवारी सुट्टीचा दिवस असून दुपारी तीनच्या सुमारांस खरेदीसाठी त्या बाहेर पडल्या होत्या. खरेदी आटोपून घरी परतानाची घाई पण कराड शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस हवालदार तृती वीर यांची कृष्णा नदीवर गर्दी पाहून त्यांचीही पावले अचानक थांबली आणि पुढच्या क्षणात त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा आणि त्याच्या आईचा जीव वाचविण्यात त्यांना यश मिळाले आहे.
कौटुंबिक किरकोळ कारणांतून या महिलेने आपल्या बाळासह जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या बाळासाठी आणि आईसाठी एक महिला पोलीस हवालदार तृप्ती वीर या धावून आल्या आणि आज नऊ महिन्यांच्या बाळाचा आणि आईचे प्राण वाचविण्यात महिला पोलिस हवालदार तृप्ती वीर यांना यश मिळाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.