Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे-बेंगळुरू महामार्गावर मध्यरात्री गोळीबाराचा थरार; एक जण गंभीर जखमी

पुणे-बेंगळुरू महामार्गावर मध्यरात्री गोळीबाराचा थरार; एक जण गंभीर जखमी

पुणे : खरा पंचनामा 

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ काल मध्यरात्री गोळीबाराची थरारक घटना घडली आहे. व्यवसायातील पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदोली फाटा येथे ही घटना घडली. कालगावचे सरपंच सोमनाथ चव्हाण आणि संतोष घोलप यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या हिशोबावरून वाद सुरू होता. काल मध्यरात्री हाच वाद प्रचंड विकोपाला गेला. यावेळी रागाच्या भरात सरपंच सोमनाथ चव्हाण याने आपल्याकडील बंदूक काढून संतोष घोलप यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या.

या अचानक झालेल्या हल्ल्यात संतोष घोलप यांच्या मांडीला आणि गुडघ्याला गोळ्या लागल्या. गोळीबारानंतर घोलप हे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच कोसळले. मध्यरात्री महामार्गावर झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक नागरिकांनी कोणतीही वाट न पाहता जखमी संतोष यांना तातडीने उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गोळ्या लागल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) तातडीने शस्त्रक्रिया केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. महामार्गावर प्रवाशांची ये-जा सुरू असतानाच अशी घटना घडल्याने प्रवाशांमध्येही सुरक्षेबाबत भीती व्यक्त होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.