Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर पोलीस दलात फेरबदल; १७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

कोल्हापूर पोलीस दलात फेरबदल; १७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

पूजा फडके 
कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रशासकीय निकडीचा विचार करून पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल (भा.पो.से.) यांनी जिल्ह्यातील १७ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक (पोनि), सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) आणि पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या संदर्भातील अधिकृत आदेश पत्रक  नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रमुख बदल्या आणि नवीन पदस्थापना 
पोनि गोरक्ष काशिनाथ चौधर : भुदरगड पोलीस ठाणे ते शिरोळ पोलीस ठाणे (प्रभारी अधिकारी)
पोनि अजित बाळकृष्ण जाधव : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते कागल पोलीस ठाणे (प्रभारी अधिकारी)
पोनि गंगाधर धोडीभाऊ घावटे : कागल पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष, कोल्हापूर
पोनि संदिप विलासराव जगताप  नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते भुदरगड पोलीस ठाणे (प्रभारी अधिकारी)
सपोनि विकास संजय शिंदे : हुपरी पोलीस ठाणे ते शवाशा इचलकरंजी (प्रभारी अधिकारी)
सपोनि मेघा प्रकाश पाटील : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते अर्ज शाखा (प्रभारी अधिकारी)
सपोनि सुजाता चंद्रशेखर चव्हाण :  नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते हुपरी पोलीस ठाणे 
सपोनि शाहनवाज बाबासाहेब मुल्ला : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर जयसिंगपूर पोलीस ठाणे
सपोनि चेतन नथुराम माने : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर  ते शाहुवाडी पोलीस ठाणे
सपोनि अमोल हणमंत साळुंखे : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते राजारामपूरी पोलीस ठाणे
पोउपनि सुरेश कुंडलिकराव गिते : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर  ते करवीर पोलीस ठाणे
पोउपनि आप्पासाहेब भिमाप्पा पालखे  : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते शवाशा कोल्हापूर 
पोउपनि संतोष पोपट कदम : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर  ते लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे
पोउपनि मानसिंग कालुसिंग राजपूत नियंत्रण कक्ष, ते कोल्हापूर गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे
पोउपनि शशिकांत दत्तात्रय पाटील :  नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते कागल पोलीस ठाणे
पोउपनि अनिल चंपतराव केळूरकर : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते गडहिंग्लज पोलीस ठाणे
पोउपनि अतिश बाबुराव म्हेत्रे :  सायबर पोलीस ठाणे ते जुना राजवाडा पोलीस ठाणे

विमानतळ सुरक्षा शाखेचा अतिरिक्त कार्यभार
या आदेशासोबतच, विमानतळ सुरक्षा शाखेचा कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त स्वरूपात गजानन लक्ष्मण पोतदार (नेमणूक: विमानतळ सुरक्षा) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
सर्व बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन तसा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाला सादर करावा, असे निर्देश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.