Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सातारा पोलीस दलात खांदेपालट; ४१ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

सातारा पोलीस दलात खांदेपालट; ४१ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

पूजा फडके 
सातारा : खरा पंचनामा 

सातारा जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव आणि विनंतीवरून मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे (भापोसे) यांनी ३० जून २०२६ रोजी जिल्ह्यातील तब्बल ४१ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या व मुदतवाढीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक (PI), सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २२ मधील पोटकलम (२) अन्वये जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने व शिफारशीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्या व नवीन नेमणुका : 
पोनि महेंद्र जयवंतराव जगताप : प्रभारी कराड तालुका पोलीस ठाणे ते प्रभारी खंडाळा पोलीस ठाणे 
पोनि घणशाम रघुनाथ बल्लाळ : नियंत्रण कक्ष ते प्रभारी फलटण शहर पोलीस ठाणे 
पोनि अरुण भीमराव देवकर : नियंत्रण कक्ष ते प्रभारी कोरेगाव पोलीस ठाणे (दि. ३०/०४/२०२६ पासून) 
पोनि अरविंद रंगनाथ काळे  प्रभारी फलटण शहर पोलीस ठाणे ते प्रभारी AHTU (अति. कार्य. सायबर पोलीस ठाणे) 
पोनि प्रदीप बाळासो सूर्यवंशी : प्रभारी AHTU ते प्रभारी वाई पोलीस ठाणे 
पोनि शीतलकुमार मारुती कोल्हाळ  नियंत्रण कक्ष  प्रभारी कराड तालुका पोलीस ठाणे 
पोनि दत्तात्रय सत्यवान देशमुख :  नियंत्रण कक्ष ते प्रभारी जिल्हा विशेष शाखा (अति. कार्य. पोलीस कल्याण व मानवी संसाधन) 
पोनि महेश किसनराव इंगळे :  नियंत्रण कक्ष ते प्रभारी शिरवळ पोलीस ठाणे 
पोनि हर्षद अरुण गालिंदे : नियंत्रण कक्ष  ते प्रभारी महाबळेश्वर पोलीस ठाणे 
पोनि बापूसाहेब पोपट सांडभोर : प्रभारी महाबळेश्वर पोलीस ठाणे ते प्रभारी नियंत्रण कक्ष 
सपोनि अभिजित रवींद्र यादव : सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखा ते स्थानिक गुन्हे शाखा (LCB) 
सपोनि अभिजित संभाजी चौधरी :   कराड तालुका पोलीस ठाणे ते कराड शहर पोलीस ठाणे 
सपोनि प्रकाश नाथू भुजबळ : पाटण पोलीस ठाणे ते कराड तालुका पोलीस ठाणे 
सपोनि राजेश जोतीबा माने : AHTU ते प्रभारी सातारा शहर वाहतूक शाखा 
सपोनि राजेश प्रकाश माळी : कराड शहर पोलीस ठाणे ते सायबर पोलीस ठाणे 
सपोनि निलेश शिवाजी तारू : कराड शहर पोलीस ठाणे ते प्रभारी पाटण पोलीस ठाणे 
सपोनि रघुनाथ कुंडलिक शिंदे : नियंत्रण कक्ष ते कोरेगाव पोलीस ठाणे 
सपोनि चंद्रहार संभाजीराव पाटील : नियंत्रण कक्ष ते सातारा तालुका पोलीस ठाणे 
सपोनि भाऊसाहेब चंद्रकांत गोसावी :  नियंत्रण कक्ष ते प्रभारी दहिवडी पोलीस ठाणे 
सपोनि संदीप लक्ष्मण साळुंखे : नियंत्रण कक्ष ते प्रभारी कराड शहर वाहतूक शाखा 
सपोनि भागश्री नवनाथ चव्हाण  नियंत्रण कक्ष ते प्रभारी अर्ज शाखा (अति. कार्य. डायल ११२) 
सपोनि प्रदीप जालिंदर जाधव : नियंत्रण कक्ष ते वाई पोलीस ठाणे 
सपोनि नितिन हनुमंत खामगळ :  नियंत्रण कक्ष ते शिरवळ पोलीस ठाणे 
सपोनि विनोद जगन्नाथ महागडे :   नियंत्रण कक्ष  आर्थिक गुन्हे शाखा 
सपोनि संदीप संपत गोसावी : नियंत्रण कक्ष ते सातारा शहर पोलीस ठाणे 
सपोनि सुनील ज्ञानदेव जानकर : नियंत्रण कक्ष ते प्रभारी औंध पोलीस ठाणे 
पोउपनि सतीश दत्तात्रय मयेकर : औंध पो. ठाणे दि. ३०/०४/२०२७ पर्यंत मुदतवाढ 
पोउपनि रमेश पंडित ठाणेकर ते उंब्रज पो. ठाणे दि. ३१/०८/२०२६ पर्यंत मुदतवाढ 
पोउपनि अविनाश श्रीकांत गवळी : सातारा शहर पोलीस ठाणे ते उंब्रज पोलीस ठाणे 
पोउपनि कृष्णा केशव डिसले : कराड शहर पोलीस ठाणे १ वर्ष मुदतवाढ 
पोउपनि सचिन दगडू भिलारी : कराड तालुका पोलीस ठाणे ते पाटण पोलीस ठाणे 
पोउपनि राजेंद्र अंकुश सदगर : पाटण पोलीस ठाणे ते वडूज पोलीस ठाणे 
पोउपनि अमित शरद शिंदे : वडूज पोलीस ठाणे ते म्हसवड पोलीस ठाणे 
पोउपनि अनिल सावळाराम जायपत्रे :  सातारा शहर पोलीस ठाणे  १ वर्ष मुदतवाढ 
पोउपनि प्रिया गंगाराम पाटील : कराड शहर पोलीस ठाणे १ वर्ष मुदतवाढ 
पोउपनि शीतल शरद माने : कराड शहर पोलीस ठाणे ते खंडाळा पोलीस ठाणे 
मपोउपनि अयोध्या प्रकाश घोरपडे : फलटण शहर पो. ठाणे ते उंब्रज पोलीस ठाणे 
 मपोउपनि दीपिका दिलीप मुसळे : नियंत्रण कक्ष, सातारा  ते सातारा शहर पोलीस ठाणे 
मपोउपनि ज्योती गोविंद बैनवाड  : नियंत्रण कक्ष डायल ११२ AHTU 
शरद नारायण देसाई : नियंत्रण कक्ष ते नियंत्रण कक्ष 
पोउपनि चंद्रकांत परशराम पुजारी : नियंत्रण कक्ष ते स्थानिक गुन्हे शाखा 

तात्काळ हजर होण्याचे आदेश:
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी आदेशात स्पष्ट केले आहे की, बदली झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही विलंबाशिवाय तात्काळ आपापल्या नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर व्हावे. तसेच, हजर झाल्याच्या तारखेसह त्याचा पूर्तता अहवाल जिल्हा पोलीस मुख्यालय आणि संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांना सादर करावा. या मोठ्या फेरबदलांमुळे सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.