Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नृसिंहवाडीत पहिला 'दक्षिण द्वार सोहळा' : भाविकांची अलोट गर्दी!

नृसिंहवाडीत  पहिला 'दक्षिण द्वार सोहळा' : भाविकांची अलोट गर्दी!

पूजा फडके 
नृसिंहवाडी : खरा पंचनामा 

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत झालेल्या दमदार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला आहे.  श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज (मंगळवार) पहाटे ३:३० वाजता चालू वर्षातील पहिला 'दक्षिण द्वार सोहळा' भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 

रात्रीत नदीची पाणीपातळी सुमारे ५ फुटांनी वाढल्याने उत्तरेकडून वाहणारे कृष्णेचे पाणी श्रींच्या चरणकमलांना स्पर्श करून दक्षिण द्वारात प्रविष्ट झाले. या पवित्र सोहळ्याची माहिती मिळताच कोल्हापूर, सांगलीसह परिसरातील हजारो भाविकांनी नृसिंहवाडीकडे धाव घेतली. मंदिर परिसर 'श्री गुरुदेव दत्त'च्या जयघोषाने दुमदुमून गेला असून भाविकांनी पवित्र स्नान व दर्शनाचा लाभ घेतला. 

सुरक्षेसाठी देवस्थानतर्फे जादा सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मुख्य मंदिरात पाणी आल्यामुळे श्रींची उत्सवमूर्ती सध्या दर्शनासाठी प.पू. श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.