Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिलेच्या घरात रात्री प्रवेश करणे पोलिसांना भोवलं, कारवाईच ठरवली बेकायदेशीरउच्च न्यायालयाचा थेट राज्य शासनालाच दणका...

महिलेच्या घरात रात्री प्रवेश करणे पोलिसांना भोवलं, कारवाईच ठरवली बेकायदेशीर
उच्च न्यायालयाचा थेट राज्य शासनालाच दणका...

नागपूर : खरा पंचनामा 

गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली रात्री उशिरा एका महिलेच्या घरात वारंवार प्रवेश करून तिची चौकशी करणे आणि तिचा मोबाइल बेकायदेशीररीत्या ताब्यात घेणे पोलिसांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी महिलेच्या गोपनीयतेच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठेवला आहे. तसेच, राज्य शासनाला दहा हजार रुपये दंड ठोठावला.

खापा कारवाई विरोधात खुशबू इ‌द्रिस खान आणि इ‌द्विश मंजर खान यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, खापा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका अपघाताच्या गुन्ह्यात इद्विश खान यांची चौकशी सुरू होती. गुन्ह्यात इ‌द्रिस यांचे नाव आरोपी म्हणून नसूनही पोलिसांनी त्यांच्या घरी वारंवार भेटी दिल्या, असा आरोप होता.

रकमेची वसुली अधिकाऱ्याकडून न्यायालयाने राज्य शासनाला संबंधित महिलेला दहा हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम दोन महिन्यांत न दिल्यास त्यावर वार्षिक आठ टक्के व्याज देण्याचेही आदेश देण्यात आले. तसेच, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारला देण्यात आले आहे.

पोलिस आयुक्तांकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीनंतर महिलांचा सन्मान, गोपनीयता आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करणे ही पोलिस यंत्रणेची घटनात्मक जबाबदारी आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, पोलिसांची कारवाई अवैध ठरवली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.