Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल सूनेचे जादूटोण्याचे गंभीर आरोप, फिरोज बाबाला अटक

माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल 
सूनेचे जादूटोण्याचे गंभीर आरोप, फिरोज बाबाला अटक

ठाणे : खरा पंचनामा 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेने त्यांच्याविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला असून कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणी फिरोज बाबा नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश, विनायक राऊत यांची पत्नी यांच्या सात जणांविरोधात हा गुन्हा दाखल आहे.

विनायक राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मुलगा गितेश यांची पत्नी सध्या घोडबंदर येथील चितळसर मानपाडा भागात वास्तव्यास आहे. १० जून यादिवशी त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात राऊत कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनुसार, २०१६ मध्ये विवाह जुळविणाऱ्या संस्थेकडे त्यांनी नोंदणी केली होती. या नोंदणीनंतर त्यांना विनायक राऊत यांचा मुलगा गितेश यांच्यासोबत विवाह जुळला. डिसेंबर २०१७मध्ये विवाह झाल्यानंतर मुंबईत बंगला असल्याची खोटी माहिती दिल्याचा दावा तक्रारीत केला. त्यानंतर पतीने तिच्याशी वैवाहिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली. याबाबत जाब विचारल्यास शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा आरोपही तिने केला आहे. तसेच सिंधुदूर्ग येथील काजीबाबा आणि फिरोज बाबा या दोघांच्या मदतीने जादूटोणा सारखे अघोरी कृत्य केल्याचेही म्हटले.

याप्रकरणी विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधात १० जूनला कापूरबावडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी व अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी फिरोज बाबा नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. यासंदर्भात विनायक राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.