महादेव बेटिंग अॅप' सट्टेबाजीच्या पैशातून अमेरिकन कंपनीची खरेदी !
आरोपी भाजपाचा विभाग प्रमुख
मुंबई : खरा पंचनामा
सहा हजार कोटींहून अधिक घोटाळ्याशी संबंधित असलेल्या सौरभ चंद्राकार याच्या महादेव ऑनलाइन बुक आणि स्कायएक्सचेंजच्या अवैध सट्टेबाजीतून मिळालेला गुन्हेगारीचा पैसा ईबिक्स इंक ही अमेरिकन कंपनी खरेदी करण्यासाठी वापरला गेल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या तपासात उघड झाले आहे.
सध्या अटकेत असलेले व्यावसायिक विकास गर्ग यांनी हा काळा पैसा आपल्या कंपन्यांकडे वळविला आणि हा व्यवहार केला. गर्ग हे दिल्ली भाजपच्या आर्थिक विभागाचे प्रमुख होते. त्यांची आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
संचालनालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काळा पैसा पांढरा करण्यासाठी बनावट कंपन्यांद्वारे रोख रकमेच्या बदल्यात अकोमोडेशन एन्ट्री तसेच दुबई, मॉरिशस व ब्रिटनमधील परदेशी कंपन्यात केलेली गुंतवणूक या द्वारे हा पैसा पांढरा करण्यात आला, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. हा पैसा गर्ग यांच्या मालकीच्या आणि नियंत्रणाखाली असलेल्या सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कंपन्यांमध्ये वळवण्यात आला. या गुन्ह्यातून कमावलेल्या पैशावर गर्ग यांनी समूह कंपन्यांमार्फत अमेरिकेतील दिवाळखोरी न्यायालयामार्फत ईबिक्स इंक या कंपनीचे ९७.५८ टक्के शेअर्स विकत घेतले व कंपनीवर ताबा मिळविला.
याशिवाय भारत आणि परदेशात शेअर्स, सिक्युरिटीज आणि इतर मालमत्ता विकत घेण्यात आल्या, असा दावा संचालनालयाने केला आहे.
या घोटाळ्यात अटक झालेले गर्ग हे चौदावे आरोपी आहेत. महादेव बेटिंग अॅप आणि स्काई रॉकेट एक्स्चेंज या बेकायदेशीर सट्टेबाजीच्या माध्यमातून कमावलेला कोट्यवधी रुपयांचा अवैध पैसा गर्ग यांनी आपल्या कंपन्यांमध्ये वळवला. 'एराया लाईफस्पेस'च्या माध्यमातून अमेरिकन फिनटेक कंपनी 'एबिक्स कॅश' मधील ६४ टक्के भागीदारी (१,१७५ कोटी) खरेदी करण्यासाठी वापरला, असेही संचालनालयाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर संचालनालयाने गर्ग आणि झाले आहे. या पार्श्वभूमीवर संचालनालयाने गर्ग आणि कुटुंबीयांच्या मालकीची ९४०.७७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
यामध्ये दिल्ली, गोवा, नैनिताल आणि इतर ठिकाणच्या १२ स्थावर मालमत्तांसह 'एराया लाईफस्पेस' मधील ८९३ कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या शेअर्सचा समावेश आहे. विकास गर्ग हे दिल्ली भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि तीन वेळा आमदार राहिलेले डॉ. नंद किशोर गर्ग यांचे पुत्र आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांची दिल्ली भाजपाच्या आर्थिक सेलचे संयोजक म्हणून नियुक्ती झाली होती. अटकेनंतर त्यांना पदावरुन दूर करण्यात आले आहे. महादेव बेटिंग अॅपच्या घोटाळ्याची संचालनालयाकडून गेल्या वर्षभरापासून चौकशी सुरु आहे.
या प्रकरणात सुरुवातीला एराया लाईफस्पेसचा संबंध आला होता. मात्र यावेळी संचालनालयाने छापे टाकल्यानंतर हे संबंध अधिक उघड झाले. आता संचालनालयाने अधिकृतपणे हे मान्य केले आहे. या प्रकरणात दुबईतून हवालाद्वारे सर्व व्यवहार करणाऱ्या इसमाचे नावही पुढे आले आहे. ही व्यक्ती अनिवासी भारतीय असून याबाबतही कारवाई होण्याची शक्यता संचालनालयातील सूत्रांनी वर्तविली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.