भाजपचा DNA ओबीसींचा नाहीतर कारखानदारांचा झालाय
लक्ष्मण हाकेंची टीका, नवीन राजकीय पक्षाची घोषणा
मुंबई : खरा पंचनामा
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठी घोषणा केली आहे. हाके नवीन राजकीय पक्ष काढणार आहेत. ओबीसी जनता पार्टी असं त्यांच्या पक्षाचं नाव असणार आहे, याबाबतची माहिती खुद्द लक्ष्मण हाके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. ओबीसींच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी आगामी काळात लक्ष्मण हाके ओबीसी जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केले आहे.
भाजपचा डीएनए हा ओबीसी राहिला नाही, आता कारखानदारांचा झाला आहे अशी टीका देखील हाके यांनी केली. तसेच भाजपने पक्ष फोडाफोडी केली याचा देखील समर्थन केलं मात्र आता काही गरज नसताना त्यांनी राष्ट्रवादीला सोबत घ्यायची तसेच शिवसेना फोडण्याची काय गरज होती ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
देशामध्ये वेगळ्या राजकीय घटना घडत आहेत. दुसऱ्या बाजूला वारी सुरु आहे. पांडुरंगाकडे एकच मागणे आहे महापुजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना एकच सद्बुद्धी मिळावी की फोडोफोडी बंद करावी. आता सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात करा, सत्ता येऊन बरेच दिवस झाले आहेत असे हाके म्हणाले.
सत्तेत बसल्यानंतर माणसं फोडण्याचं काय कारण आहे असे हाके म्हणाले. भाजपला सत्तेत जाण्यासाठी एकनाथ शिंदेंची गरज होती. मात्र अजितदादांच्या गटाची काय गरज होती असे हाके म्हणाले. एकदा तुम्ही ममता बॅनर्जीचा पक्ष फोडता, उरलासुरला उद्धवठाकरेंचा पक्ष फोडता असे हाके म्हणाले. उद्धव ठाकरेंचे खासदार तर जी लोखं फुटली त्यांचे विरोधात निवडून आले आणि तेच परत शिंदेकडे गेल्याचे हाके म्हणाले. भाजपचा डीएनए आता कारखानदारांचा झालाय. भाजपचा डीएनए आता प्रसाद लाड आहे, प्रविण दरेकर आहे असी टीका हाकेंनी केलीय.
सत्ता येत असतात जात असतात मुख्यमंत्री येत असतात जात असतात. पण मी ज्या प्रवर्गाची भाषा बोलतोय त्याच्या शोषणावर राष्ट्रवादीने काय केलं ते मला सांगा असा सवाल हाकेंनी केला. राष्ट्रवादीनं कोणता लढा उभारलाय ते मला सांगा असे हाके म्हणाले. राष्ट्रवादी नेमही सत्तेच्या वळचणीला गेले. कारखाने काढले, उद्योगपतींशी साटलोटं केलं. दोन्ही राष्ट्रवादी एक आहेत. निवडणुका लढल्या तरी हे तुम्हाला दाखावण्यासाठी आहे. हे लोक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे कुणी सांगितले असे हाके म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.