Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'ज्यांनी शुद्ध भावनेने दान केले नव्हते, त्यांचेच पैसे राम मंदिरातून दानपेटीतून चोरीला गेले'भाजपा आमदाराने तोडले अकलेचे तारे

'ज्यांनी शुद्ध भावनेने दान केले नव्हते, त्यांचेच पैसे राम मंदिरातून दानपेटीतून चोरीला गेले'
भाजपा आमदाराने तोडले अकलेचे तारे

अयोध्या : खरा पंचनामा 

अयोध्येतील राम मंदिरातील लुटीमुळे दुखावलेल्या तमाम रामभक्तांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य भाजपचे आमदार व उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीन महाना यांनी केले आहे. 'ज्यांची श्रद्धा खरी नव्हती, ज्यांनी शुद्ध भावनेने दान केले नव्हते, त्यांचे पैसे दानपेटीतून चोरीला गेले,' असे अकलेचे तारे महाना यांनी तोडले आहेत.

राम मंदिराच्या दानपेटीतील कोट्यवधींच्या लुटीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यासाच्या ट्रस्टींना राजीनामे द्यावे लागले. एसआयटीकडून सर्वोच्च न्यायालयाने अहवाल मागवला. असे असताना महाना यांनी राम मंदिर ट्रस्टवर विश्वास व्यक्त केला. "राम मंदिर ट्रस्टने देणग्यांचा पैसा विकासकामात लावला आहे. मंदिराचे भव्य स्वरूप हा त्याचा पुरावा आहे. त्यामुळे देणग्यांच्या वापराबाबत संशय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे ते म्हणाले. "जिन्होंने सच्ची श्रद्धा से दान नहीं किया, राम मंदिर में उन्हीं का चढ़ावा चोरी हुआ।" असं विधान महाना यांनी केलं आहे.

"जे कधी जय श्रीराम बोलले नाहीत किंवा ज्यांनी राम मंदिरासाठी काही दिले नाही, त्यांनाच चोरीची जास्त चिंता आहे. आतापर्यंत देशातील कुठल्या संस्थेत कधी चोऱ्या झाल्याच नाहीत का?" असा अजब सवाल त्यांनी केला. ट्रस्ट बरखास्तीची मागणीही चुकीची असल्याचे महाना म्हणाले. त्याचप्रमाणे, "आमचा पैसा चोरी झाला नाही, आमचा पैसा मंदिरात लागला आहे आणि मंदिराचा भव्य स्वरूप याचा पुरावा आहे," असंही महाना म्हणालेत. एवढ्यावरच न थांबता, "श्रद्धेने दिलेला पैसा कधी चोरी होत नाही. जो श्रद्धेने देतो तो परत मागत नाही," असं महाना यांनी म्हटलं आहे.

या विधानावरुन टीकेची झोड उठल्यानंतर सतीश महाना यांनी हे विधान कांग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या संदर्भात दिले असल्याचे स्पष्ट केले. दिग्विजय सिंह यांनी 'माझा पैसा परत करा' अशी मागणी केल्याचा उल्लेख करत, "ज्यांनी श्रद्धेने दान केले नसेल, ते परत मागतात," असा टोला महाना यांनी लगावला. "जे लोक पूर्वी बाबरी मशिदीच्या बाजूने होते किंवा राम मंदिरावर प्रश्न उपस्थित करत होते, ते आता देणगीबाबत प्रश्न विचारत आहेत," असा टोलाही महाना यांनी स्पष्टीकरण देताना दिग्विजय सिंह यांना लगावला आहे. या टीकेवरुन आता दिग्वजय सिंह काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.