सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत नोटिसीला केंद्र सरकारचं उत्तर
हायकोर्टानं याचिका काढली निकाली
दिल्ली : खरा पंचनामा
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सोनम यांची प्रकृती खालावली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी ल्या २० दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक वांगचुक यांनी केलीय. दरम्यान, सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर दिल्ली हायकोर्टाने सोनम वांगचुक यांचा जीव वाचवण्यासाठी योग्य त्या हालचाली करण्याचे आदेश देताना केंद्र सरकारला नोटीस बजावली होती. या नोटिसीला केंद्र सरकारने उत्तर दिलंय.
केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांची सरकारी डॉक्टरांकडून तपासणी करण्याची आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. केंद्र सरकारच्या उत्तरानंतर हायकोर्टानं जनहित याचिका निकाली काढली आहे.
हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर केंद्र सरकारकडून गुरुवारी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व्हर्चुअली हजर झाले होते. न्यायालयाने जीवन मौल्यवान असल्याचं सांगत तुषार मेहता यांना सरकारी डॉक्टरांकडून सोनम यांची तपासणी करण्यास सांगण्यात आलं. याचिकेचा उल्लेख करत म्हटलं की, सोनम गेल्या १७-१८ दिवसांपासून उपोषण करतायत आणि त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे.
हायकोर्टात केंद्र सरकारने सांगितलं की, खासगी डॉक्टर सोनम वांगचुक यांची तपासणी करतायत. जेव्हा सरकारी डॉक्टरना परवानगी दिली जाते तेव्हा तेही तपासणी करतात. सोनम यांच्या प्रकृतीकडे आमचं लक्ष आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणतीही वैद्यकीय मदत लागल्यास ती केली जाईल.
केंद्राकडून मदतीची तयारी दर्शवल्यानंतर हायकोर्टाने म्हटलं की, कोणत्याही नागरिकाचा जीव महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे. त्यामुळे नागरिकाला वाचवण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. आरोग्य बिघडण्यापासून थांबवण्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्याची आवश्यकता असेल तर ते करावेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.