धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर अभिजीत दीपकेंचा मोर्चा अमित शहांकडे
थेट राजीनाम्याची मागणी करत म्हणाले, "तुम्ही फेल..."
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात झालेल्या बळाच्या वापराचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पण तिथे तो त्यांना बोलू दिलं नसल्याचा आरोप करत पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषद त्यांनी, "गृहमंत्र्यांना दिल्ली पोलिसांकडून सातत्यानं ब्रीफिंग दिली जात होती. मी स्वतः अमित शहांना पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलताना पाहिल्याचा दावा केला. त्यामुळे दोनच शक्यता आहेत, एक तर गृहमंत्र्यांना कारवाईची माहिती होती किंवा मग त्यांना काहीच माहीती नव्हती. दोन्ही परिस्थितींमध्ये जबाबदारी निश्चित व्हायला हवी. पंतप्रधानांनी अमित शहांना पदावरून दूर करायला हवं, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
याच मुद्द्यावरून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट अमित शहांचा राजीनामा घ्यायला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. दीपके म्हणाले, "गोळीबार झाला त्याचे आदेश अमित शहांनी दिले होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे", असं मला वाटतं.
दरम्यान, यावेळी त्यांनी सीजेपीला परदेशातून फंडिंग होतं या मुद्द्यावरून देखील शहांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "जर सीजेपीला बाहेरून फंडिंग येतय, सीजेपी बाहेरून चालवण्यात येतंय तर मग माझ्या मनात असं येतं की, अमित शहा गृहमंत्री असताना हे कसं शक्य झालं? आणि जर हे असं असेल तर हे पूर्ण त्यांचं अपयश आहे, हे कसले चाणक्य आहेत?" असा सवाल दीपके यांनी उपस्थित केला.
तुम्ही असताना बाहेरून फंडिंग येत असेल तर स्वतः तुम्ही फेल झाला असून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी दीपके यांनी केली. तसंच यावेळी त्यांनी २० तारखेला जंतरमंतरवर जे दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांचं रक्त सांडलं ते देखील अमित शहांच्या ऑर्डरशिवाय झालेलं नाही, असा दावा देखील दीपके यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दीपके यांनी आपला मोर्चा थेट गृहमंत्री अमित शहांकडे वळवल्याचं पाहायला मिळतंय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.