सिमेंट रस्ता बनवणाऱ्या मशिनचे स्पेयर पार्ट चोरणारे दोघे गजाआड;
८ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त : सांगली शहर पोलिसांची कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील माधवनगर रोड, टी.व्ही.एस. शोरूमजवळून सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करणाऱ्या मशिन्सचे महागडे स्पेयर पार्टस चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या काही तासांत अटक केली आहे. आरोपींकडून ४,३९,०००/- रुपये किमतीचे चोरीचे स्पेयर पार्टस् आणि गुन्ह्यात वापरलेला ४,००,०००/- रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ८,३९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माधवनगर रस्त्यावरील टी.व्ही.एस. शोरूमजवळ दिनांक १९ जुलै ते २० जुलै दरम्यान उघड्यावर ठेवलेल्या 'Wirtgen Group sp 1200' आणि 'Apollo HEM' या सिमेंट काँक्रीटचा रस्ता करणाऱ्या मशिन्सचे स्पेयर पार्टस् अज्ञात चोरट्यांनी लांबवले होते. याप्रकरणी फिर्यादी मदन रेबा कांता हाजारीका (वय ४३, मूळ रा. आसाम, सध्या रा. रुक्मिणीनगर, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सांगली शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.
दिनांक २४ जुलै रोजी पोलीस अंमलदार गौतम कांबळे व संतोष गळवे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा अनिके त वाघमारे व अक्षय कोरे यांनी केला असून ते न्यू प्राईड हॉटेल परिसरात थांबले आहेत.
पोलिसांनी तातडीने सापळा रचून न्यू प्राईड हॉटेलच्या समोरून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये अनिकेत पोपट वाघमारे (वय २१ वर्षे, रा. अवचितनगर, रविवार पेठ, माधवनगर, ता. मिरज, जि. सांगली), अक्षय बाळू कोरे (वय ३५ वर्षे, रा. संजयगांधी नगर, म्हाडा कॉलनी, सी-विंग, मिरज, जि. सांगली) असे आहेत.
जप्त केलेला मुद्देमालमध्ये (एकूण ८,३९,०००/- रुपये):, स्पेयर पार्टस् (किंमत ₹४,३९,०००/-), Front Fixed Control Plate (२ नग) - ₹१,००,०००/-, Middel Fixed Plate (०२ नग) - ₹१,००,०००/-, Hanger Fixed Plate (०२ नग) - ₹५०,०००/-, Hanger Stand (०२ नग) - ₹३५,०००/-, Dowell Bar Stand (०१ नग) - ₹३५,०००/-, Stand Smother (०२ नग) - ₹३०,०००/-, Paver Stand (०३ नग) - ₹२५,०००/-, Chesis (०२ नग) - ₹२२,०००/-, Side Plate (०२ नग) - ₹४२,०००/-, वाहन: आयशर कंपनीचा टेम्पो (क्रमांक MH-04-FJ-3707, किंमत ₹४,००,०००/-) असा आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पाटील करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.