Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बेकायदेशीर वाळू आणि मुरुम वाहतूक करणारे दोन डंपर जप्त!मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

बेकायदेशीर वाळू आणि मुरुम वाहतूक करणारे दोन डंपर जप्त!
मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

मिरज : खरा पंचनामा 

मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दिनांक २ जुलै च्या रात्री ११:०० ते ३ जुलैच्या पहाटे ५:०० वाजेच्या दरम्यान गस्त घालत असताना पोलिसांनी अवैध वाळू आणि मुरुमाची वाहतूक करणारे दोन डंपर जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, प्रवीण यादव, पोहेकॉ भरत पवार, चालक मनोज जाधव आणि रामचंद्र शिंदे हे कर्तव्य बजावत असताना हॉटेल मंत्राजवळ संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली.

पहिली कारवाई अवैध वाळू वाहतूक: डंपर (क्रमांक KA 23 B 7222) मधून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करताना चालक जुबेर अशपाक पटेल (वय ३० वर्ष, रा. औरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हा मिळून आला.
 तर दुसरी कारवाईमध्ये अवैध मुरुम वाहतूक डंपर (क्रमांक MH 10 AQ 1621) मधून बेकायदेशीररित्या मुरुमाची वाहतूक करताना चालक युवराज शंकर यलपरटे (वय २९ वर्ष, रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली) हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेऊन सविस्तर रिपोर्टसह पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसीलदार मिरज यांच्या स्वाधीन केली आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास तहसीलदार करत आहेत.

ही यशस्वी कारवाई मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, प्रवीण यादव, भरत पवार, सचिन हाक्के, मनोज जाधव, रामचंद्र शिंदे आणि प्रदीप कुंभार यांच्या पथकाने केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.