तुकाराम मुंढे यांच्याकडे आता 'हाफकीन'ची नवी जबाबदारी

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील औषध निर्माते, मेडिकल दुकान, हॉटेलवाले तसेच दूध, पनीर भेसळ करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपवण्याची घोषणा अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली.

मुंबईतील हाफकीन बायो फार्म संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत ज्योती गायकवाड, विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, योगेश सागर, अजय चौधरी, रईस शेख, अस्लम शेख, विश्वजीत कदम, विकास ठाकरे, प्रशांत ठाकूर, म्हणून जामसुतकर, सुनील राऊत, अतुल भातखळकर आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी हिरवा यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

विविध प्रकारच्या लसी तयार करणाऱ्या मुंबईतील हाफकिन संस्थेची जागा विक्री केली जाणार नाही, तिचं खासगीकरण केलं जाणार नाही अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. एकेकाळी वैभव असणारी ही संस्था आज डबघाईला आली आहे, तिचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे तिला वाचवा अशी आग्रही मागणी सर्वच सदस्यांनी केली होती. याबाबत नेमलेल्या डॉ रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल देखील सभागृहात सादर करण्यात येईल असं मंत्री म्हणाले.

यावेळी झालेल्या चर्चा दरम्यान अनेक सदस्यांनी सरकारने हपकिन बंद करण्याचा आणि रिलायन्स कंपनीला विकण्याचा घाट घातल्याचा आरोप केला मधील विविध औषधे निर्मितीचे फॉर्मुले तेथील अधिकाऱ्यांनी अन्य कंपन्यांना विकले असून मुंबईचे वैभव असलेली हाफकीन संस्था अखेरची घटका मोजत आहे. या संस्थेत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनेक सदस्यांनी केली.

सभागृहातील दोन्ही बाजूच्या सदस्यांनी या संस्थेवर धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्या संस्थेवर किंवा कोणत्या पदावर कोणत्या सनदी अधिकाऱ्याला नेमायचे हा सर्वस्वी सरकारचा निर्णय असून सदस्यानी येथे कोणतेही आदेश किंवा सूचना करू नये. असे निर्देश दिले. अखेर या संस्थेचा अतिरिक्त कार्यभार तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवला जाईल. त्यांच्या माध्यमातून ही संस्था पूर्व पदावर आणण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही झिरवळ यांनी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.