Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोयनेत पावसाचा जोर मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

कोयनेत पावसाचा जोर 
मुसळधार पावसामुळे  पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

कराड : खरा पंचनामा 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण क्षेत्रात आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू असून धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात तब्बल ८९,००० क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

या प्रचंड आवकीमुळे धरणाचा एकूण पाणीसाठा आता ५० टीएमसी (अर्धशतक) ओलांडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत असलेल्या महाबळेश्वर आणि नवजा या दोन्ही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस सुरू असून, यामुळेच धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.