कर्मवीर पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
ठेवी १००% सुरक्षित : संचालक मंडळ
सांगली : खरा पंचनामा
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेबाबत सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या आणि व्हिडिओ पूर्णपणे दिशाभूल करणारे असल्याचा जाहीर खुलासा संस्थेच्या संचालक मंडळाने केला आहे. संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असून ठेवीदारांचा प्रत्येक रुपया पूर्णपणे सुरक्षित आहे, असा विश्वास पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने दिला आहे.
लेखापरीक्षण (Audit) पूर्ण होताच वार्षिक सर्वसाधारण सभा होईल.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आर्थिक वर्ष २०२५-२०२६ चे वैधानिक लेखापरीक्षण नियमानुसार सुरू आहे. लेखापरीक्षणाचे काम उशिरा सुरू झाल्यामुळे अंतिम अहवाल मिळण्यास काही दिवसांचा विलंब होत आहे. लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर संचालक मंडळ तो स्वीकारेल आणि त्यानंतरच वार्षिक सभेची तारीख जाहीर केली जाईल.अफवांना पूर्णविराम देत संस्थेने आपली आर्थिक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
संस्थेकडे उत्तम तरलता (Liquidity) असून कर्जाच्या वसुलीचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. पतसंस्थेचे प्रशासन सुरळीत आणि पारदर्शकपणे काम करत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम, संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू आणि सर्व संचालक मंडळाने सभासद, ठेवीदार व हितचिंतकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या पोस्टवर विश्वास ठेवून विचलीत होऊ नये. संस्थेशी प्रत्यक्ष खात्री केल्याशिवाय कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नये, असे नम्र आवाहन पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.