तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर
नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय
नागपूर : खरा पंचनामा
वर्धातील सुप्रसिद्ध गोरस भांडारवरील एफडीएची कारवाई बेकायदेशीर असल्याचामहत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने दिला आहे. एफडीएने निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहे.
त्यामुळे तुकाराम मुंढे आणि त्यांच्या 'अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विरोधात गोरस भांडारचा एक मोठा विजय झाला आहे. तर एफडीएच्या कारवाईला मोठा दणका देण्यात आलाआहे.
दरम्यान, 31 मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाने गोरस भंडारवर धाड टाकत तिथे अस्वच्छता असल्याचे कारण देत परवाना निलंबित केला होता. एफडीएच्या कारवाईमुळे गोरस भंडारला लाखो रुपयांचा नुकसान होऊन 9 लाख रुपयांचे दुग्धजन्य उत्पादन फेकून द्यावे लागले होते.
परिणामी हे नुकसानआता अन्न व औषध प्रशासन विभागाने भरून द्यावे, अशी मागणी गोरस भांडारचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी केली आहे.
अस्वच्छतेचा ठपका ठेवून आमचे खाद्य पदार्थ जप्त केले. मात्र, जप्त केलेल्या पदार्थांच्या चाचणीचे अहवाल येण्यापूर्वीच आमचा परवाना रद्द केला. ही कारवाई शेतकऱ्यांच्या दूध वितरण व्यवस्थेवर घाला घालणारी असल्याचे सांगत वर्ध्यातील "गोरस भंडार" संस्थेने सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. 31 मे रोजी एफडीएने केलेली कारवाई अयोग्य होती. गोरस भंडारला दूध देणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांच्या दुधाचे वापर होऊ शकेल. हजारो ग्राहकांना ताजे दूध मिळू शकेल, अशी व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. दरम्यानही कारवाई बेकायदेशीर असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने दिला आहे.
एफडीएने आमचा परवाना तात्पुरता रद्द करताना आमच्याकडे लाकडी चुलीवर खाद्यपदार्थ निर्मित होतात, तिथे धूर आणि अस्वच्छता होते असा ठपका ठेवला. मात्र मुळातच आम्ही कुटीर उद्योग असल्याने मशीनचा कमीत कमी वापर करून आमचे दुग्धजन्य पदार्थ लाकडी चुलीवर बनवण्याला प्राधान्य देतो. कारण चुलीवरच्या निर्मितीमुळे दुग्धजन्य पदार्थाचा दर्जा चांगला होतो, त्यांना एक वेगळी आणि ग्राहकांना आवडणारी चव मिळते. त्यामुळे चुलीवर दुग्धजन्य पदार्थ बनवतो. म्हणून आमच्याकडे अस्वच्छता आहे असे म्हणणे योग्य नाही, असे मत गोरस भंडारचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.