देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या 341 व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
पुणे : खरा पंचनामा
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी अवघी देहू नगरी सज्ज झाल्याचा पाहायला मिळत आहे. यावर्षी तुकोबांचा 341 वा पालखी प्रस्थान सोहळा देहू नगरीमध्ये साजरा होत आहे आणि त्यासाठीच देहूच्या मुख्य मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.
देहूचा मंदिर परिसर, सभामंडप या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. हजारो देशी-विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आलेली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून आत मध्ये आल्यानंतर संत तुकोबांचा फुलांमध्ये रेखाटलेले चित्र पाहायला मिळत आहे आणि वारकऱ्यांचं हेच आकर्षण या ठिकाणी असल्याचा पाहायला मिळत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.