Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पिंपरी चिंचवडचे डीसीपी धीरज पाटील यांना पितृशोक एस. डी. पाटील सर यांचे निधन

पिंपरी चिंचवडचे डीसीपी धीरज पाटील यांना पितृशोक 
एस. डी. पाटील सर यांचे निधन 

कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर जिल्ह्यातील भेडसगाव येथील प्रख्यात शिक्षक एस. डी. पाटील यांचे वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. पिंपरी चिंचवड येथील डीसीपी धीरज पाटील यांचे ते वडील होत.

भेडसगाव येथे शोकाकुल वातावरणात बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, राजकीय, शैक्षणिक, उदयोग, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रातील फार मोठी हानी झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.