महाराष्ट्र पोलीस दलातील ११ अधिकाऱ्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त / उपअधीक्षकपदी पदोन्नती
अनिल तनपुरे पुणे शहरचे सहायक आयुक्त
पूजा फडके
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ३१ जुलै २०२६ रोजी एक महत्त्वाचा शासन आदेश जारी केला असून, पोलीस निरीक्षक (नि:शस्त्र) संवर्गातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) / पोलीस उप अधीक्षक (DySP) या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देऊन त्यांच्या नवीन पदस्थापना जाहीर केल्या आहेत. गृह विभागाचे सहसचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने हा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
पदोन्नती मिळालेले अधिकारी आणि नवीन पदस्थापना :
बाळासाहेब नारायण पवार : पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालना
श्रीमती स्नेहा कृष्णदेव गिरी : पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण
श्रीमती स्वाती महादेव गायकवाड : पोलीस उप अधीक्षक, अकोला लोहमार्ग उपविभाग
श्रीमती निर्मला मानसिंग परदेशी : पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, धाराशिव
सुनिल गोपीनाथ रोहोकले : उपविभागीय पोलीस अधिकारी, पेठ उपविभाग, नाशिक ग्रामीण
श्रीमती विमल आवडाजी बिडवे : सहाय्यक पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई
आनंद तिरुनाईक मुदलीयार : सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई शहर
अनंत सिताराम साळुंके : अपर पोलीस अधीक्षक (ए.टी.पी.), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
सूर्यकांत देवराव कोकणे : पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण
तयुब युनूस मुजावर : पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती
अनिल हरिभाऊ तनपुरे : सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर
ही पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून या पदावर सेवाज्येष्ठतेचा किंवा नियमितीकरणाचा (Regularization) कोणताही अधिकार अधिकाऱ्यांना असणार नाही. सदर पदोन्नती सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका तसेच मा. मुंबई उच्च न्यायालयातील याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील.
या निवडीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) मान्यता घेणे बंधनकारक असणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.