बनावट डेटिंग प्रोफाईल आणि सायबर गुन्ह्यांवर सांगलीच्या एपीआय रुपाली बोबडे मार्गदर्शन करणार
केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष लाईव्ह सत्र
पूजा फडके
नवी दिल्ली / सांगली : खरा पंचनामा
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या 'इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर' (I4C) अंतर्गत 'सायबर दोस्त' द्वारे आयोजित Cyber Safe Live उपक्रमांतर्गत विशेष लाईव्ह सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात महाराष्ट्रातील पहिल्या महिला सायबर कमांडो तथा सांगली सायबर सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत.
बनावट डेटिंग प्रोफाईल, सेक्सटॉर्शन आणि ऑनलाईन नातेसंबंधांमागील सायबर गुन्ह्यांची भीषण वास्तवता उघडकीस आणणे हा या सत्राचा मुख्य उद्देश आहे. The Person You Matched Never Existed (बनावट डेटिंग प्रोफाईल आणि ऑनलाईन फसवणूक)या विषयावर दिनांक: बुधवार, ५ ऑगस्ट २०२६, सायंकाळी ४:०० वाजता एपिसोड EP 81
या लाईव्ह सत्रात ऑनलाईन फसवणूक कशी ओळखायची, डेटिंग ॲप्स वापरताना कोणती काळजी घ्यावी आणि ब्लॅकमेलिंगपासून स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी थेट मार्गदर्शन केले जाईल. नागरिकांनी या ऑनलाईन सत्रात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सायबर साक्षर व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.