भाजपा जैन प्रकोष्ठच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपप्रमुखपदी समीर शहा तर सांगली जिल्हा शहर सेक्रेटरी पदी दर्शन गणे यांची निवड
सांगली : खरा पंचनामा
भारतीय जनता पक्ष (भाजपा) जैन प्रकोष्ठच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रदेश उपप्रमुख पदी सांगलीतील मिरज येथील समीर किरण शहा (फुरिया) यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांनी केली आहे. तसेच, सांगली जिल्हा शहर भाजपा जैन प्रकोष्ठ सेक्रेटरी पदी दर्शन भूपाल गणे यांची निवड सांगली जिल्हा शहर अध्यक्ष महावीर पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.
सांगली येथील स्वदेशी व्हिला येथे आयोजित बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. या बैठकीत आगामी ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या भाजपा जैन प्रकोष्ठच्या वर्धापन दिनाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे येथून पदाधिकारी व सदस्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यादृष्टीने पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान जैन प्रकोष्ठ भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते समीर शहा यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तर महावीर पाटील यांच्या हस्ते दर्शन गणे यांचा सत्कार करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी अमित चिंचवाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.