Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पेपर लीक प्रकरणात खळबळजनक ट्वीस्ट ! 'ती' तक्रारच खोटी? विद्यार्थ्यानेच रचला बनाव

पेपर लीक प्रकरणात खळबळजनक ट्वीस्ट ! 
'ती' तक्रारच खोटी? विद्यार्थ्यानेच रचला बनाव

मुंबई : खरा पंचनामा 

नीट पेपरफुटीनंतर एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदासाठीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद याबाबत सर्वात गंभीर आरोप केले आहेत.

अशातच आता या पेपर फुटीप्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट आला आहे. या परीक्षेतील कथित गैरव्यवहाराबाबत आलेली तक्रार ही बनावट असल्याचे समोर येत असून, पुन्हा परीक्षा घेतली जावी यासाठीच हा सगळा बनाव रचण्यात आल्याची माहिती एमपीएससीमधील सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या पदासाठी २२ मार्च रोजी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर करण्यात आला, तर १ ते २१ जुलै या कालावधीत पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर २२ जुलै रोजी अंतिम निवडीची यादी जाहीर करण्यात आली. यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या एका दिवसा B म्हणजेच २३ जुलै रोजी एमपीएससीकडे ईमेलद्वारे एक तक्रार प्राप्त झाली. आयोगाने तत्परता दाखवत लगेचच त्या तक्रारदाराला सर्व संबंधित पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, संबंधित उमेदवार आणि तक्रारदार या दोघांनाही प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

अशातच या प्रकरणाला नाट्यमय वळण लागले असून काल रात्री त्याच तक्रारदाराने एमपीएससीला आणखी एक ईमेल पाठवला. या मेलमध्ये त्याने आधी केलेली तक्रार पूर्णपणे बनावट असल्याचे कबूल केले. पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही, या विचारातून पेपर फुटल्याची खोटी बतावणी करून पुन्हा परीक्षा घेतली जावी, यासाठीच हा सगळा बनाव रचण्यात आल्याचे या मेलमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, तसेच, २० मार्च रोजी घडल्याचे सांगितले गेलेल्या कथित संभाषणाची तक्रार थेट २४ जुलैपर्यंत इतक्या मोठ्या विलंबाने का दाखल करण्यात आली, या तांत्रिक मुद्याचाही सखोल तपास आता केला जात आहे. काल रात्री आलेला ईमेल आणि त्यात केलेले खुलासे लक्षात घेऊन, आज बोलावण्यात आलेल्या सर्व संबंधितांची कसून चौकशी सुरू आहे. यातून या बनावामागील नेमका कट काय होता, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.