Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? 
मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा 

दिल्ली : खरा पंचनामा 

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा NDA सोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच मंगळवारी रात्री माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली.

यामुळे या चर्चांना अधिक जोर आला. या सगळ्यावरच आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चेवर भाष्य केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून आमचा पक्ष सत्तेत सामील होणार असल्याच्या बातम्या येत आहे. मात्र, क्षाने अद्याप यावर कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये.

तसेच जी काय भूमिका दाखवली जात आहे ती सुत्रांमार्फत दाखवली जात आहे. असे कुठल्याही प्रमुख नेत्याने यावर भाष्य केलेलं नाही. मी संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ आणि बंटी पाटील यांच्याशी फोनवर चर्चा करून सांगितले आहे की, राष्ट्रवादी एनडीएसोबत जाण्याची चर्चा पक्षात नाही असे सांगत त्यांनी या सगळ्या चर्चाचे खंडन केले.

डिलिमिटेशन बिला संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महिला आरक्षणाचे बिल हे पास झाले असून त्याबाबत कुठलीही शंका नाहीये. मी तुम्हाला थोडंस इतिहासात नेते, किरीन रिजिजू यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, ओवेसी, आणि मला दिल्लीत बोलावले होते. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह देखील होते. त्यांनी आम्हाला या विधेयका संदर्भात सगळी माहिती दिली.

या विधेयकामुळे कोणावरही अन्याय होणार नाही काश्मीर ते कन्याकुमारी सगळीकडे एकच नियम लागू होईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे त्यामध्ये सुधारणा होणार असून त्याचा प्रस्ताव आल्यावर आम्ही 24 तासांत अभ्यास करून आमची भूमिका मांडू असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.